Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

पंजाबमधील फगवाडा येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात विद्यार्थिनीवरील कथित बलात्काराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला. आंदोलनादरम्यान विद्यापीठ परिसरात तोडफोड आणि जाळपोळ झाल्याने तणाव निर्माण झाला असून, प्रशासनाने दहा दिवस वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 28, 2026 | 12:20 PM
LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थिनीवरील बलात्काराच्या आरोपानंतर LPU परिसरात विद्यार्थ्यांचा उद्रेक
  • वाहनांची जाळपोळ, तोडफोड; विद्यार्थी-पोलिसांमध्ये झटापट
  • हिंसाचारानंतर १० दिवस वर्ग बंद; सेमिस्टर परीक्षाही पुढे ढकलल्या
 

पंजाब : फगवाडा येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात विद्यार्थिनीवरील कथित बलात्काराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला. रविवारी (२७ सप्टेंबर) रात्री विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. काही वाहने, तसेच पोलिसांच्या वाहनांनाही आग लावण्यात आल्याची माहिती आहे. या हिंसाचारानंतर विद्यापीठ प्रशासनाने २८ सप्टेंबरपासून पुढील दहा दिवस वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सेमिस्टर परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बाहेरील व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही माहिती विद्यार्थ्यांमध्ये पसरल्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विविध भागांत तोडफोड केली. काही वाहनांना आग लावण्यात आली, तर विद्यापीठाच्या सुशोभिकरण केलेल्या भागाचेही नुकसान झाले.

हेही वाचा: Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

वसतिगृहाबाहेर विद्यार्थी-पोलिसांमध्ये झटापट

विद्यापीठातील मुलींच्या क्रमांक तीन वसतिगृहाबाहेर विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांनी एका प्लंबरवर विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या घटनेची माहिती वसतिगृह अधीक्षकांना देण्यात आली होती; मात्र त्यांच्याकडून योग्य कारवाई झाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबाहेर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांनी महामार्गावरील वाहतूक रोखल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांची वाहनेही पेटवली

लाठीचार्जनंतर संतप्त विद्यार्थी पुन्हा विद्यापीठ परिसरात दाखल झाले. त्यानंतर विविध ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांची चार ते पाच वाहने विद्यार्थ्यांनी पेटवून दिल्याची माहिती समोर आली आहे. या हिंसाचारात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही सांगण्यात आले. घटनेनंतर विद्यापीठ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आणि दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Pune Crime: पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी

दहा दिवस वर्ग बंद

तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने २८ सप्टेंबरपासून दहा दिवस वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सेमिस्टर परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या असून, परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. वर्ग बंद असल्याने विद्यार्थ्यांना पालकांशी चर्चा करून दहा दिवसांसाठी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. जे विद्यार्थी विद्यापीठ परिसरात राहणार आहेत, त्यांनी वसतिगृहातच राहावे आणि विनाकारण बाहेर फिरू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, विद्यार्थिनीवरील कथित बलात्कारप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. ઘટનाक्रमाची चौकशी आणि हिंसाचारातील सहभागींची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Url slug lovely professional university student protest violence rape case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • crime news
  • Punjab
  • Rape Case
  • Student Protest

संबंधित बातम्या

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
1

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
2

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
3

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
4

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.