Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Greenland खरेदीचा नवा फंडा? ट्रम्प यांनी पाठवलं अत्याधुनिक हॉस्पिटल शिप; जगात खळबळ

Trump Greenland Strategy : ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या लोकांना मदत करण्यासाठी अमेरिकेचे अत्याधुनिक हॉस्पिटल शिप पाठवले आहे. हा ट्रम्प यांचा ग्रीनलँड खरेदीसाठी नवा फंडा असल्याचे म्हटले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 22, 2026 | 04:29 PM
Trump Sends Us Navy Hospital Ship To Greenland

Trump Sends Us Navy Hospital Ship To Greenland

Follow Us
Follow Us:
  • ग्रीनलँड खरेदीसाठी ट्रम्प यांची नवी खेळी
  • लोकांच्या मदतीसाठी पाठवली हॉस्पिटल शिप
  • डेन्मार्कने अद्याप अशा कोणत्याही विनंतीची पुष्टी केलेली नाही
Trump sends Greenland Hospital Ship : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी ग्रीनलँडसाठी एक अत्याधनुकि हॉस्पिटल शिप पाठवले आहे. त्यांच्या या आश्चर्यकारक निर्णयाने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. लुईझियानाचे गव्हर्नर जेफ्री लँड्री यांच्या सहकार्याने ग्रीनलँडमधील आजारी लोकांसाठी ही मदत पाठवली असल्याचे ट्रम्प यांनी आपल्या घोषणेत म्हटले आहे. मात्र ग्रीनलँड (Greenland) किंवा डेन्मार्कने अद्याप अशा कोणत्याही जहाजाची विनंती करण्यात आली असल्याची पुष्टी केलील नाही. यामुळे ट्रम्प नेमका कोणता खेळ खेळत आहेत असा प्रश्न सर्वांना पडला आहे?

Greenland Dispute : ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन फसला? कॅनडा-फ्रान्सने उचललं हे मोठं पाऊल; ग्रीनलँड विकत घेण्याचं स्वप्न भंगणार?

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याची घोषणा शेअर करत म्हटले की, ग्रीनलँडच्या लोकांची योग्य काळजी घेण्यासाठी लुईझियानाच्या राज्यपालांसोबत ते चर्चा करत आहे. त्यांनी सांगितले की, एक हॉस्पिटल शिप आधीच मार्गावर असून तेथील लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देईल. याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. तसेच ग्रीनलँडने देखील अशा कोणत्याही मदतीची विनंती केल्याची पुष्टी केलेली नाही.

ग्रीनलँडवरुन वाद

ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या नियंत्रणाखालील एक स्वायत्त देश आहे. गेल्या वर्षापासून ट्रम्प ग्रीनलँड खरेदीसाठी प्रयत्न करत आहे. परंतु ग्रीनलँडच्या लोकांना आणि डेन्मार्कने ट्रम्प यांचा हा प्रस्ताव नाकराला आहे. यामुळे दोन्ही देशांत तणाव लक्षणीरित्या वाढला आहे. तसेच युरोपीय देशांनी देखील अमेरिकेच्या ग्रीनलँडवरील नियंत्रणाला विरोध केला होता. यामुळे ट्रम्प यांनी या देशांना टॅरिफची धमकी दिली होती. सध्या ट्रम्प यांनी डेन्मार्कच्या परवानगीशिवाय पाठवलेले हॉस्पिटल शिप त्यांच्या सार्वभौम प्रदेशात घुसखोरी मानली जात आहे. यामुळे वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे.

राजकीय स्तरावर खळबळ

ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे डेन्मार्क आणि ग्रीनलँडच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय राजकारमातही खळबळ उडाली आहे. परवानगीशिवाय अशी मदत पाठवण्यामागे ट्रम्प यांची मोठी खेळी असल्याचे म्हटले जात आहे. ट्रम्प आता ग्रीनलँड खरेदीसाठी कोणता नवा फंडा वापरत आहेत असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प भू-राजकीय स्थितीवर आणि त्यांच्या नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या डेन्मार्क आणि डॅनिश लोक ट्रम्प यांच्या या मदतीला कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Greenland Controversy : ग्रीनलँड अमेरिकेचाच! ट्रम्पने ‘तो’ फोटो शेअर करत दिला इशारा; डेन्मार्कचा चढला पारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी ग्रीनलँडसाठी कोणती घोषणा केली आहे?

    Ans: ग्रीनलँडच्या लोकांची योग्य काळजी घेण्यासाठी लुईझियानाच्या राज्यपालांसोबत ते चर्चा करत आहे. त्यांनी सांगितले की, एक हॉस्पिटल शिप आधीच मार्गावर असून तेथील लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देईल, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.

  • Que: ट्रम्प यांच्या वैद्यकीय मदतीवर ग्रीनलँड सरकार आणि डेन्मार्कने काय प्रतिक्रिया दिली

    Ans: ट्रम्प यांच्या वैद्यकीय मदतीवर ग्रीनलँड सरकार आणि डेन्मार्कने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु अद्याप अमेरिकेला अशा कोणतीही मदत पाठवण्याची पुष्टीही करण्यात आले नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

  • Que: ट्रम्प यांच्या निर्णयामागे काय हेतू आहे?

    Ans: तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प ग्रीनलँडमधील भू-राजकीय स्थितीवर आणि त्यांच्या नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title: Trump sends us navy hospital ship to greenland new strategy to buy greenland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Greenland
  • World news

संबंधित बातम्या

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन
1

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
2

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
3

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
4

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.