दर तासाला 3 कोटी...; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांच्या आदेशानंतर व्हेनेझुएलावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मेक द अमेरिका ग्रेट अगेन (MEGA)मोहिमेला विरोध म्हणून मानली जात आहे. अनेकांनी ट्रम्प यांच्या या कारवाईला तीव्र विरोध केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी यासाठी अब्जावधींचा खर्च केल्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात अमेरिकेत संतापाचे वातावरण आहे.
ट्रम्प यांनी २०२४ च्या निवडणुकांमध्ये MEGA ची घोषणा करत अमेरिका दुसऱ्या देशात ऑपरेशन्स किंवा लष्करी मोहिमेसाठी एकही पैसा खर्च करणार नसल्याचे म्हटले होते. परंतु ट्रम्प प्रशासनाने वचन पाळले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या व्हेनेझुएलावरील कारवाईचे नेतृत्त्व हे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्याकडे आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते, या कारवाईला भविष्यात त्यांना दोषी ठरवले जाऊ शकते असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.






