नाशिकमध्ये शरद पवारांना मोठा धक्का (फोटो- सोशल मीडिया)
महानगरपालिका निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा धक्का
नाशिकमध्ये पक्षाच्या उपाध्यक्ष यांनी दिला राजीनामा
महानगरपालिका निवडणुकीआधी तापले राजकारण
Sharad Pawar Ncp: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षांच्या युती झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान निवडणुकीआधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
महानगरपालिका निवडणूक होण्याआधी शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्ह्यात बड्या नेत्याने त्यांची साथ सोडली आहे. शरद पवारांची साथ सोडून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
शरद पवारांच्या नेत्याने साथ सोडल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नाशिक प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे. नितीन भोसले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात एकचल खळबळ उडाली आहे.
कमळ हाती घेताच संतोष धुरींनी केली आगपाखड
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मुंबई आणि पुण्यासह 29 पालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. प्रचाराचा धुराळा उडाला असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. मुंबईमध्ये मराठी मते राखण्यासाठी ठाकरे बंधूंची युती झाली आहे. मात्र निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का मिळाला आहे. मनसेचे निष्ठावंत म्हणून ओळख जाणारे संतोष धुरी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच संतोष धुरी यांनी कमळ हाती घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
संतोष धुरी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडला आहे. मनसेला सोडल्यानंतर त्यांनी मनसेच्या विरोधात वक्तव्य केली आहेत. संतोष धुरी यांनी उद्धव ठाकरेंसोबत केलेल्या युतीवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, “मुंबईत मनसेला 52 जागा सोडल्याचे दिसत आहेत. मात्र, त्यापैकी सात किंवा आठ सीट निवडून येईल की नाही, याचीही शाश्वती नाही. उद्धव ठाकरे गटाने आम्हाला पाहिजे त्या सीट दिल्या नाहीत. उलट ज्या जागांवर ठाकरे गटाकडे उमेदवारच नव्हते किंवा ज्याठिकाणी त्यांच्या विद्यमान नगरसेवकाचे नाव खराब झाले होते, अशा जागा ठाकरे गटाने मनसेला देऊ केल्या,” असा घणाघात संतोष धुरी यांनी केला आहे.






