Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“भाजपलाही पक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसच्याच नेत्यांची गरज; पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला टोला

कराड काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 01, 2025 | 11:26 AM
काँग्रेसला साथ देणारे निष्ठावंत कार्यकर्ते ही काँग्रेसची शक्ती

काँग्रेसला साथ देणारे निष्ठावंत कार्यकर्ते ही काँग्रेसची शक्ती

Follow Us
Close
Follow Us:

कराड : काँग्रेसचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे काँग्रेस कधीही संपू शकत नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातून सुरू झालेला काँग्रेसचा प्रवास आजही जनतेच्या मनात जिवंत आहे. काँग्रेसने देशाच्या प्रगतीसाठी सत्ताकाळात उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र, सत्तेसाठी भाजपने खोट्या आरोपांवर आधारित नरेटिव्ह तयार करत जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवली, असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

कराड काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, अजित पाटील, झाकीर पठाण, निवासराव थोरात, बंडानाना जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 2014 मध्ये भाजपने काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून सत्तेवर येण्याचा मार्ग शोधला. मात्र, नंतर हे आरोप न्यायालयात सिद्ध झाले नाहीत आणि काँग्रेसचे नेते निर्दोष ठरले. तरीही काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. याउलट भाजपच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. भाजपकडे स्वतःचे कार्यकर्ते किंवा संघटनात्मक ताकद नसल्याने काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्त्यांना गळाला लावून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपलाही पक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसच्याच नेत्यांची गरज लागली, असा टोला कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणारी भाजप आज काँग्रेसयुक्त झाली आहे, हे त्यांनाही कळले नाही,” अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील निवडणूक निकाल अनपेक्षित होते. आजचे आमदार हे जनतेने निवडलेले नसून “इव्हिएम आमदार’ आहेत,” अशी टीका काँग्रेस नेते अजित पाटील यांनी केली. काँग्रेसने लोकशाही मूल्ये जपली, तर भाजपने ती पायदळी तुडवली आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आधी फडणवीस आणि अमित शहा यांना त्यांच्याबद्दल विचारावे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

राजकीय हेतूने ईडी, सीबीआयचा वापर

पुढे ते म्हणाले की, “सत्तेचा गैरवापर करत भाजपने ईडी, सीबीआय, आयटी आदी यंत्रणांचा वापर करून काँग्रेस नेत्यांवर दबाव टाकला. विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेताना त्यांना क्लिनचिट दिली जात आहे. हा प्रकार लोकशाहीच्या मुल्यांना धक्का देणारा असून भाजपने केवळ सत्तेसाठी देशातील धार्मिक सलोखा आणि शांतता बिघडवली आहे,” असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

भाजपचा विकास हा आकड्यांचा खेळ

“भाजपने विकासाचे जे आकडे मांडले आहेत, ते खोटे असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. कोणतीही ठोस विकासनीती राबवलेली नाही. धार्मिक ध्रुवीकरण करून सत्तेवर टिकण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा देश कधीही प्रगती करू शकत नाही, हे जागतिक इतिहासाने सिद्ध केले असल्याचे देखील कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

Web Title: Prithviraj chavan target bjp in karad congress meeting political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • Congress
  • former Chief Minister Prithviraj Chavan
  • political news

संबंधित बातम्या

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश
1

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Bihar Assembly Election 2025 : महाराजगंज जागा कोण जिंकणार? जाणून घ्या या जागेचा निवडणूक इतिहास
2

Bihar Assembly Election 2025 : महाराजगंज जागा कोण जिंकणार? जाणून घ्या या जागेचा निवडणूक इतिहास

Congress on RSS: लाल किल्ल्यावरून मोदींकडून RSSचे कौतुक…; काँग्रेस नेत्यांनी थेट इतिहासच काढला
3

Congress on RSS: लाल किल्ल्यावरून मोदींकडून RSSचे कौतुक…; काँग्रेस नेत्यांनी थेट इतिहासच काढला

PM Modi On RSS: “व्यक्ती निर्माण ते राष्ट्र…”; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘RSS’ वर स्तुतीसुमने
4

PM Modi On RSS: “व्यक्ती निर्माण ते राष्ट्र…”; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘RSS’ वर स्तुतीसुमने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.