Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार; १४ ते १५ बदलांची चर्चा

प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने पुणे महानगरपालिकेच्या प्रभागरचनेला मान्यता दिली आहे. अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना (वॉर्ड गॅझेट) सोमवारपर्यंत प्रसिद्ध होणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 04, 2025 | 03:24 PM
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

Follow Us
Close
Follow Us:
  • चार साडेचार वर्षांपासून निवडणूका रखडल्या होत्या
  • राज्य निवडणूक आयोगाने पुणे महानगरपालिकेच्या प्रभागरचनेला मान्यता
  • पुणे महापालिकेची निवडणूक चार सदस्यांच्या प्रभागरचनेनुसार होणार

Pune Ward structure:  गेल्या चार-साडेचार वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्य सरकारने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली असून त्यासाठी प्रक्रिया राबवण्यासही सुरुवात केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. तर त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जातील.

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून नियोजनाला सुरुवात झाली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका या २०११ च्या जनगणनेनुसार घेण्यात येणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ साडेतीन वर्षांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर प्रशासकांकडे कारभार सोपविण्यात आला होता. राज्य सरकारने महापालिका आयुक्तांनाच प्रशासक म्हणून नेमले असून सध्या त्यांच्याच माध्यमातून पुणे महानगरपालिकेचा कारभार सुरू आहे.

राज्यातील महापालिकांचा कार्यकाळ संपल्यापासून महापालिकेच्या निवडणुका घेण्याची सातत्याने मागणी केली जात होती. पण गेल्या चार साडेचार वर्षांपासून निवडणूका रखडल्या होत्या. त्यावर निर्णयही होत नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून, पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केली आहे.

प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने पुणे महानगरपालिकेच्या प्रभागरचनेला मान्यता दिली आहे. अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना (वॉर्ड गॅझेट) सोमवारपर्यंत प्रसिद्ध होणार आहे. या अधिसूचनेनंतर महापालिकेने तयार केलेल्या आराखड्यात कोणते बदल करण्यात आले आहेत, याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे. त्यामुळे पुणेकरांचे लक्ष आता या अधिसूचनेकडे लागले आहे.

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…

पुणे महापालिकेची निवडणूक चार सदस्यांच्या प्रभागरचनेनुसार होणार असून १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. महापालिकेने प्रारूप प्रभागरचना तयार करून प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर चार ४ सप्टेंबर पर्यंत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. प्रारूप प्रभागरचनेवर तब्बल १० हजार हरकती आल्या होत्या त्यात ८२८ नागरिकांनी सुनवणीस प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्या हरकती नोंदवल्या. या प्रकरणात वरिष्ठ सनदी अधिकारी व्ही.पी, राधा यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर आवश्यक बदल करून अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली. त्यास आयोगाची मान्यता मिळाल्याने आता पुढील निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रारूप आराखड्यावर आलेल्या हरकती आणि सुनावणीनंतर शासनाने सुमारे १४ ते १५ बदल केल्याची चर्चा आहे. यामध्ये ६ ते ७ प्रभागांच्या नावांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, ८ ते १० प्रभागांच्या हद्दींमध्ये फेरबदल झाले आहेत. विशेषतः उपनगरांतील काही प्रभागांच्या सीमारेषांमध्येच मुख्य बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, अंतिम अधिसूचना (वॉर्ड गॅझेट) प्रसिद्ध झाल्यानंतरच प्रभागांचे अधिकृत स्वरूप स्पष्ट होणार आहे.

 

Web Title: Pune municipal corporations final ward structure to be announced soon 14 to 15 changes discussed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 03:24 PM

Topics:  

  • Local Body Election
  • Pune Municipal Corporation

संबंधित बातम्या

SC Local Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टाने दिली 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ
1

SC Local Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टाने दिली 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ

स्थानिक स्वराज्य निवडणुकींचे बिगूल वाजले; अजित पवार स्वतः ऐकून घेणार नागरिकांच्या तक्रारी
2

स्थानिक स्वराज्य निवडणुकींचे बिगूल वाजले; अजित पवार स्वतः ऐकून घेणार नागरिकांच्या तक्रारी

प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील सुनावणींची औपचारिकता पूर्ण; आता बदलाकडे लागले सर्वांचे लक्ष
3

प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील सुनावणींची औपचारिकता पूर्ण; आता बदलाकडे लागले सर्वांचे लक्ष

Mutha River Revitalization Project: पुणेकरांची पुराची समस्या संपणार! काय आहे पुणे महापालिकेचा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प?
4

Mutha River Revitalization Project: पुणेकरांची पुराची समस्या संपणार! काय आहे पुणे महापालिकेचा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.