Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता

राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी पुढच्या महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणुकांची घोषणा बुधवारी (दि.७) होण्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 07, 2026 | 07:56 AM
राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता

राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण आहे. त्यातच राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे. चालू आठवड्यातच दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या सर्व निवडणुकांच्या घोषणा आज केल्या जातील, असे सांगण्यात येत आहे.

राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी पुढच्या महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणुकांची घोषणा बुधवारी (दि.७) होण्याची शक्यता आहे. राज्यात ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाककडून केली जात आहे. यातील १७ जिल्हा परिषदा आणि ८८ पंचायत ५० समित्यांमध्ये टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेमध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.

हेदेखील वाचा : Prithviraj Chavan News: डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींचे अपहरण करतील? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पण आरक्षणाच्या पेचामुळे जिल्हा परिषद निवडणुकीवर परिणाम झाला आहे. या आरक्षणामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यास उशिर होत आहे. पण आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. ७ फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयोगाच्या बैठकीत होणार मंथन

निवडणूक आयोगाने बुधवारी प्रशासनाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यात मनपा निवडणुकांची मतमोजणी, निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकांच्या संभाव्य तारखांवर चर्चा होणार आहे. मनपाची रणधुमाळी आटोपताच जिल्हा परिषद निवडणुका घेणे शक्य आहे का, यावर अधिकाऱ्यांची स्पष्ट भूमिका या बैठकीत जाणून घेतली जाण्याची शक्यता आहे.

राज्यात अपुरे मनुष्यबळ

प्रशासनापुढे मनुष्यबळाचा प्रश्न असल्याने जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची मुभा देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या महानगरपालिका निवडणुका सुरू असून, त्यासाठी मोठे अधिकारी व कर्मचारी बळ तैनात आहे.

Web Title: Elections for 32 zilla parishads and 336 panchayat samiti in the state are likely to be announced today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 07:56 AM

Topics:  

  • Local Body Election
  • Maharashtra Politics
  • ZP Election

संबंधित बातम्या

Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान
1

Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान

Maharashtra Politics: राजकारण फिरले! ‘या’ बड्या नेत्याने सोडली शरद पवारांची साथ, निवडणुकीआधी खळबळ
2

Maharashtra Politics: राजकारण फिरले! ‘या’ बड्या नेत्याने सोडली शरद पवारांची साथ, निवडणुकीआधी खळबळ

Mumbai Crime News: दहिसरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोन जणांना बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3

Mumbai Crime News: दहिसरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोन जणांना बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Politics: “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ
4

Maharashtra Politics: “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.