Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नरेंद्र मोदी हे पुढील वर्षापर्यंत पदत्याग करतील,” राहुल गांधी यांचा मोठा दावा

काँग्रेसची अल्पसंख्यांक सल्लागार समितीची बैठक काल (शनिवार, २३ मे) पार पडली. या बैठकीत लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मोठा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील वर्षापर्यंत पदत्याग करतील असे वक्तव्य केले आहे.

  • By विवेक
Updated On: May 24, 2026 | 07:52 PM
Rahul Gandhi slams Narendra Modi

Rahul Gandhi slams Narendra Modi

Follow Us
Follow Us:
  • काँग्रेसची अल्पसंख्यांक सल्लागार समितीची बैठकीत लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा दावा
  • “नरेंद्र मोदी हे पुढील वर्षापर्यंत पदत्याग करतील,” राहुल गांधी यांचा मोठा दावा
  • या विधानाने आता राजकीय वर्तुळात खळबळ
काँग्रेसची अल्पसंख्यांक सल्लागार समितीची बैठक काल (शनिवार, २३ मे) पार पडली. या बैठकीत लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मोठा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील वर्षापर्यंत पदत्याग करतील असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यावरून सत्ताधारी नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी म्हणाले कि, “आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती आणि देशातील वाढता असंतोष हे प्रमुख घटक असतील. बदलत्या परिस्थितीचा आणि लोकांच्या वाढत्या असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होईल,” असे ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्याने आता राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु झाल्या आहेत. काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांनी हि बैठक आयोजित केली होती.

बैठकीदरम्यान काही नेत्यांनी ‘मुस्लिम’ शब्दा ऐवजी ‘अल्पसंख्यांक” हा शब्द वापरण्याचाही सूचना केली होती. मात्र राहुल गांधी यांनी याला विरोध केला. ते म्हणाले, ‘अन्यायाला सामोरे जाणाऱ्या कोणत्याही समुदायाच्या पाठीशी आपण उघडपणे उभे राहिले पाहिजे. घाबरण्याची काही गरज नाही. हिंदू, दलित, उच्चवर्णीय, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन अश्या सर्वांच्या हक्कांसाठी काँग्रेसने आवाज उठवला पाहिजे,” असे ते यावेळी म्हणाले.

भाजपचा पलटवार

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “राऊत व राहुल यांच्यात साम्य काय? दोघेही खोट्या भविष्यवाण्या न चुकता करतात आणि प्रत्येकवेळी तोंडावर आपटतात! “मोदी सरकार आज जाणार, उद्या जाणार, महिन्याअखेरीस कोसळणार, वर्षाअखेरीस पडणार…” अशा भंपक भविष्यवाण्यांचा उद्योग करणारे विरोधकांचे टोळके कायम सक्रिय असते. आता त्या टोळीचे नेतृत्व बहुधा काँग्रेसच्या ‘पप्पू’कडे गेले असावे!”

डिझेल-पेट्रोलसाठी जनतेमध्येच हाणामारी, हर्षवर्धन सकपाळ सरकारवर भडकले!

ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे झाले, राऊत झाले, ममता बनर्जी झाल्या, स्टॅलिन झाले, नाना पटोले झाले… ‘इंडी’ आघाडीतील जवळपास प्रत्येक नेत्याने मोदी सरकार पडणार अशी वल्गना केली. पण जनतेने प्रत्येकवेळी त्यांचीच हवा काढली. आता अचानक राहुल गांधींना “ज्ञानप्राप्ती” झाली आणि त्यांनी नवा दावा केला — “पुढील वर्षभरात नरेंद्र मोदी सरकार कोसळणार!” विरोधकांची ही हास्यजत्राच सुरू आहे आणि त्यात सध्या विनोदी कलाकाराची भूमिका राहुल गांधी बजावत आहेत. खोटारडेपणा, दिशाभूल आणि सततच्या अपयशी भविष्यवाण्यांमुळे “रिजेक्टेड नेता” हा किताब त्यांनी आधीच मिळवला आहे, हे देश विसरलेला नाही. राहुलजी, तुम्ही चक्क रेटून बोला, चीनच्या स्क्रिप्टवर बिनधास्त डोला… सुपारीबाजांचा खेळ कितीही रंगला, तरी मोदी सरकार जनतेच्या विश्वासावर भक्कम उभं राहिलं!” असे ते यावेळी म्हणाले.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कृपेमुळे मुख्यमंत्री झाले”; यशोमती ठाकूर यांचा देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

Web Title: Rahul gandhi says modi government will collapse in next year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • narendra modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
1

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक
2

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक

Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे रान पेटले! राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते आज राजघाटवर
3

Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे रान पेटले! राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते आज राजघाटवर

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!
4

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.