Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आधी हाडं मोडलात, आता FIR दाखल करताय’; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

जंतर-मंतर आंदोलनादरम्यान एका तरुणीवर दाखल झालेल्या FIR वरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. आंदोलकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी 'जनरेशन झेड'ला धमकावता येणार नाही, असे म्हटले.

  • By विवेक
Updated On: Jul 31, 2026 | 03:39 PM
'जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा'; राहुल गांधींचा सरकारला इशारा, प्रशांत किशोरांच्या विजयाचीही चर्चा

'जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा'; राहुल गांधींचा सरकारला इशारा, प्रशांत किशोरांच्या विजयाचीही चर्चा

Follow Us
Follow Us:
  • FIR प्रकरणावर राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल
  • CJP कडूनही आंदोलकांवरील कारवाईला विरोध
  • दिल्ली सरकारने आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत भूमिका केली स्पष्ट
 

जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी मोदी सरकारवर तरुणांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

काय म्हणाले राहुल गांधी ?

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत, “तुम्ही ‘जनरेशन झेड’ला धमकावून गप्प करू शकत नाही. आधी त्यांची हाडं मोडली, आता त्यांच्यावर FIR दाखल करत आहात. तुम्ही भारताचा भूतकाळ आहात. भारताच्या भविष्याशी कसे वागता याबाबत सावध राहा,” असे म्हटले.

PM Modi and Amit Shah – you cannot threaten Gen Z into silence. First you broke their bones. Now you are filing FIRs and taking down their accounts. You are India’s past. Be careful about how you treat India’s future. — Rahul Gandhi (@RahulGandhi) July 31, 2026


हे प्रकरण २३ जुलै रोजी जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाशी संबंधित आहे. आंदोलनादरम्यान एका तरुणीने पंतप्रधानांविरोधात कथित आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नोएडा एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात झिरो FIR नोंदविण्यात आला असून पुढील तपासासाठी तो दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

Shivsena Bow And Arrow Hearing: …तर शिंदे मुख्यमंत्री झालेच नसते!; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा ठाकरे गटासाठी आक्रमक

CJP चाही कारवाईवर आक्षेप

दरम्यान, आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) नेही या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी संबंधित वक्तव्य योग्य नसल्याचे मान्य केले, मात्र अशा प्रकरणात फौजदारी यंत्रणेचा वापर करणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. अपमानास्पद वक्तव्यावर कायदेशीर पर्याय उपलब्ध असले तरी आंदोलनकर्त्यांवर कठोर फौजदारी कारवाई करणे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही, असे त्यांनी म्हटले.

याचवेळी त्यांनी तरुणांना सार्वजनिक व्यासपीठावर शब्दांचा संयम राखण्याचे आवाहन केले. तसेच पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाखाली काम न करता कायद्याची निष्पक्ष अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

Sanjay Raut PC: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले; संजय राऊतांचा घणाघात

दुसरीकडे, दिल्ली सरकारने आंदोलनांशी संबंधित प्रकरणांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलनकर्त्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आंदोलकांवरील कारवाई टाळण्याची मागणी ही CJP च्या प्रमुख मागण्यांपैकी एक असल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Rahul gandhi slams modi shah over fir against jantar mantar protester

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Amit Shah
  • CJP Protest
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
1

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
2

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना
4

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.