Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdas Athawale : सरकार चर्चेला तयार आहे, राहुल गांधींनी संसदेत यावे; रामदास आठवलेंचं खुलं आव्हान

Ramdas Athawale : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेचे आव्हान दिल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'सरकार चर्चेसाठी तयार आहे, राहुल गांधींनी हिवाळी अधिवेशनात संसदेत यावे. मीदेखील त्यांच्याशी डिबेट करू शकतो,' असे आठवले म्हणाले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 04, 2026 | 07:52 PM
Ramdas Athawale : सरकार चर्चेला तयार आहे, राहुल गांधींनी संसदेत यावे; रामदास आठवलेंचं खुलं आव्हान

Ramdas Athawale : सरकार चर्चेला तयार आहे, राहुल गांधींनी संसदेत यावे; रामदास आठवलेंचं खुलं आव्हान

Follow Us
Follow Us:
  • रामदास आठवलेंच विविध विषयांवर भाष्य
  • शाहनवाज हुसेन यांचाही राहुल गांधींवर निशाणा
  • दिया मिर्झा प्रकरणावरही भाष्य
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना चर्चेचे आव्हान देणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चर्चा करायची असेल तर संसदेत या. सरकार चर्चेसाठी तयार आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात राहुल गांधी यांनी उपस्थित राहून त्यांना हव्या असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करावी, असा टोला आठवले यांनी लगावला. एवढेच नव्हे, तर राहुल गांधी यांच्याशी आपणही खुली चर्चा करू शकतो, असेही ते म्हणाले.

मुंबईत बुधवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना आठवले म्हणाले की, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेचे आव्हान दिले, ही बाब ठीक आहे. मात्र, खुल्या मैदानात चर्चा करण्यापेक्षा संसदेत चर्चा होणे अधिक योग्य आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विशेष अधिवेशनही बोलावले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आगामी हिवाळी अधिवेशनात संसदेत उपस्थित राहून त्यांना ज्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, ते मुद्दे मांडावेत.

सरकार राहुल गांधी यांच्या आव्हानाला घाबरत नाही. सरकार मजबूत असून चर्चेसाठी पूर्णपणे तयार आहे. राहुल गांधी यांच्याशी चर्चेला मीदेखील तयार आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

शाहनवाज हुसेन यांचाही राहुल गांधींवर निशाणा

दरम्यान, भाजप नेते शाहनवाज हुसेन यांनीही राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. संसद हे चर्चेचे व्यासपीठ असताना राहुल गांधी तिथे चर्चा करण्याऐवजी संभ्रम निर्माण करणारी विधाने करतात, असा आरोप त्यांनी केला.

विरोधी पक्षनेते झाल्यापासून राहुल गांधी यांनी संसदेचे कामकाज रोखण्याचेच काम केले आहे. संसदेऐवजी ते रस्त्यांवर ‘बनावट संसद’ भरवतात. संसदेतील चर्चेत सरकारने त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले असून, प्रत्येक वेळी राहुल गांधी यांचे दावे खोडून काढले आहेत, असा दावाही शाहनवाज हुसेन यांनी केला.

इंडिया आघाडीची रामलीला मैदानावरील रॅली अपयशी ठरल्याने चर्चेत राहण्यासाठी राहुल गांधी अशा प्रकारची विधाने करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांच्याशी भाजपच्या युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्षही चर्चा करू शकतो, असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

Mumbai News : अंगणवाडी सेविका-मदतनीसांची दिवाळी गोड! मुंबईतील १०,२०० महिलांना भाऊबीज भेट थेट खात्यात

महिलेला मारहाण करणे चुकीचेच

दरम्यान, काँग्रेस खासदाराशी संबंधित कथित थप्पड प्रकरणावरही रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काँग्रेसचे एक नेते महिलेला थप्पड मारताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांचा सन्मान करणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी आहे. महिलेला थप्पड मारणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. संबंधित व्यक्तीने याबद्दल माफी मागावी, अशी मागणीही आठवले यांनी केली.

Raj Thackeray: ‘पुढच्या वर्षी पुन्हा एकदा…’, राज ठाकरेंनी ट्विट करत केली मोठी घोषणा; यंदा दीपोत्सव रद्द, नेमकं कारण काय?

दिया मिर्झा प्रकरणावरही भाष्य

अभिनेत्री दिया मिर्झाशी संबंधित प्रकरणावर बोलताना आठवले यांनी तिचे कौतुक केले. प्रत्येक धर्माला आपापल्या पद्धतीने सण साजरे करण्याचा अधिकार आहे. दिवाळीत फटाके फोडले जातात. मात्र, प्रदूषणाचा प्रश्नही महत्त्वाचा असून, प्रदूषण होऊ नये यावर आपले एकमत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना काय आव्हान दिले?

    Ans: राहुल गांधी यांनी संसदेत येऊन सरकारशी चर्चा करावी. त्यांच्याशी आपणही खुली चर्चा करण्यास तयार असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

  • Que: राहुल गांधी यांनी कोणाला चर्चेचे आव्हान दिले होते?

    Ans: राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेचे आव्हान दिले होते.

  • Que: रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना कोणत्या अधिवेशनात चर्चेसाठी उपस्थित राहण्यास सांगितले?

    Ans: आगामी हिवाळी अधिवेशनात संसदेत उपस्थित राहून विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याचा सल्ला आठवले यांनी दिला.

Web Title: Ramdas athawale challenges rahul gandhi winter session debate rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • narendra modi
  • Rahul Gandhi
  • Ramdas Aathvale

संबंधित बातम्या

Seva First Innovation Challenge : AI पासून कृषीपर्यंत… युवकांच्या कल्पनांना मिळणार आर्थिक पाठबळ; ‘सेवा फर्स्ट’ ची विक्रमी नोंदणी
1

Seva First Innovation Challenge : AI पासून कृषीपर्यंत… युवकांच्या कल्पनांना मिळणार आर्थिक पाठबळ; ‘सेवा फर्स्ट’ ची विक्रमी नोंदणी

‘देशाला मोदीजी हवे आहेत’, CM Devendra Fadnavis यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल, संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सुनावलं!
2

‘देशाला मोदीजी हवे आहेत’, CM Devendra Fadnavis यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल, संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सुनावलं!

‘भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’, Harshvardhan Sapkal यांचा फडणवीसांवर घणाघात! PM मोदी, अमित शाहांनासुद्धा घेरलं
3

‘भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’, Harshvardhan Sapkal यांचा फडणवीसांवर घणाघात! PM मोदी, अमित शाहांनासुद्धा घेरलं

Sanjay Raut : अमित शाहांना गृहमंत्रिपदावरून हटवा! संजय राऊतांची मोदींकडे मोठी मागणी; 13 कोटी घुसखोरांच्या मुद्द्यावरून थेट सवाल
4

Sanjay Raut : अमित शाहांना गृहमंत्रिपदावरून हटवा! संजय राऊतांची मोदींकडे मोठी मागणी; 13 कोटी घुसखोरांच्या मुद्द्यावरून थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.