Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi on Gokul Milk Politics: गोकुळच्या राजकारणात राहुल गांधींची एंट्री; भाजपला थेट इशारा, शेतकरी विसरणार नाहीत…

Rahul Gandhi On Gokul Milk Union: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडी राज्य सरकारने सहकार कायद्यात बदल करून गोकुळवर ४ शासननियुक्त संचालक (Government Nominated Directors) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोकुळचे राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 05, 2026 | 12:14 PM
Rahul Gandhi On Gokul Milk Union, Satej Patil Gokul Election BJP, Gokul Nominated Directors Controversy,

Rahul Gandhi On Gokul Milk Union, Satej Patil Gokul Election BJP, Gokul Nominated Directors Controversy,

Follow Us
Follow Us:
  • गोकुळमध्ये ४ संचालक वाढवून बहुमताची चोरी केल्याचा राहुल गांधींचा आरोप
  • सत्ता टिकवण्यासाठी भाजप आता कोणत्याही थराला जात आहे- राहुल गांधी
  • सत्ता हस्तगत करण्याच्या महायुतीच्या प्रयत्नांविरोधात सतेज पाटलांचा आक्रमक इशार
Rahul Gandhi on Gokul  Milk  Politics: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दुधसंघामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू समविचारी आघाडीने महायुतीलच्या पॅनेलचा दारूण पराभव केला. त्यानंतरही गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरुन राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. गोकुळमधील हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. पराभवानंतर भाजपने पुन्हा एकदा तिरपा डाव टाकत गोकुळवर शासन नियुक्त संचालकपद नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मैदानात उतरले आहेत.

राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मिडिया ट्विटर एक्सवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. ” गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपचा पराभव केला. त्यामुळे भाजपने निवडणुकीनंतर नियमच बदलले. चार संचालक वाढवले, १२ चे १६ केले आणि बहुमताची चोरी केली. ही दूध उत्पादकांच्या मतांची चोरी आहे. हे जनादेशात फेरफार करणे आहे. भाजप इतका हताश झाला आहे की, सर्वत्र सत्ता टिकवण्यासाठी तो कोणत्याही थराला जात आहे. जे दूध उत्पादकांची मते चोरतात, त्यांनी हे लक्षात ठेवावे—शेतकरी कधीही विसरत नाहीत.” अशी टिका राहुल गांधी यांनी केली आहे.

Gokul Story: गोकुळात श्रीकृष्णाने बदलल्या श्रद्धा, परंपरा आणि समाजाची …

गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया। तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए – 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है – जनादेश में मिलावट। भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है। दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें – किसान भूलता नहीं। — Rahul Gandhi (@RahulGandhi) November 5, 2026

 

Gokul Milk Union Election Twist: गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीवरून …

राहुल गांधी यांच्या ट्विटपाठोपाठ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत. “कोल्हापूरच्या ५५०,००० दूध उत्पादकांचा आवाज बनल्याबद्दल धन्यवाद, राहुलजी… गोकुळला मिळालेला कौल शेतकऱ्यांचा आहे. आम्ही न्यायालयात आणि रस्त्यावर उतरून लढू..” असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

धन्यवाद राहुल जी, कोल्हापुर के साढ़े पाँच लाख दूध उत्पादकों की आवाज़ बनने के लिए…गोकुल का जनादेश किसानों का है. कोर्ट में भी लड़ेंगे और सड़क पर भी… — Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 5, 2026

“लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या बहुमताचा अवमान करून चोरट्या मार्गाने गोकुळची सत्ता हस्तगत करण्याचा हा प्रयत्न करत आहेत. पण सरकारच्या या मनमानी कारभाराविरोधात आणि सहकार क्षेत्रातील हस्तक्षेपाविरोधात आम्ही शांत बसणार नाही. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्यासोबतच थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा खुला इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडी राज्य सरकारने सहकार कायद्यात बदल करून गोकुळवर ४ शासननियुक्त संचालक (Government Nominated Directors) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोकुळचे राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत आणि राजकीय समीकरणात या चार नवीन संचालकांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार असून, प्रशासकीय पातळीवर यासाठीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे.

Hinjawadi- District Court Metro Line 3: पुणेकरांसाठी खास बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर ‘मेट्रो लाईन ३’ अखेर सुरू

शासननियुक्त संचालकांची नावे निश्चित करून त्यांना अध्यक्ष निवडीच्या विशेष सभेला उपस्थित राहण्यासाठीची अधिकृत पत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया पुढील तीन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. ‘गोकुळ’च्या संचालक मंडळात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीकडे बहुमत असले, तरी महायुती सरकारने नेमलेल्या ४ नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यास अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील चुरस आणि राजकीय गणिते पूर्णपणे बदलू शकतात.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी भाजपवर काय आरोप केले आहेत?

    Ans: राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की, गोकुळमध्ये शेतकऱ्यांनी भाजपचा पराभव केल्यावर भाजपने नियम बदलून ४ संचालक वाढवले (१२ चे १६ केले) आणि बहुमताची चोरी केली, जे शेतकरी कधीही विसरणार नाहीत.

  • Que: राहुल गांधी यांच्या ट्विटवर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या ५.५ लाख दूध उत्पादकांचा आवाज बनल्याबद्दल राहुल गांधी यांचे आभार मानले आणि सरकारच्या या मनमानी कारभाराविरोधात न्यायालयात दाद मागण्यासोबतच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला.

  • Que: गोकुळच्या सत्तासंघर्षात 'शासननियुक्त संचालकांचा' मुद्दा का तापला आहे?

    Ans: निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीला बहुमत मिळाल्यानंतरही, राज्य सरकारने ४ अतिरिक्त संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अध्यक्ष निवडीचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Rahul gandhi slams bjp over gokul milk union nominated directors satej patil as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Ramdas Athawale : सरकार चर्चेला तयार आहे, राहुल गांधींनी संसदेत यावे; रामदास आठवलेंचं खुलं आव्हान
1

Ramdas Athawale : सरकार चर्चेला तयार आहे, राहुल गांधींनी संसदेत यावे; रामदास आठवलेंचं खुलं आव्हान

‘देशाला मोदीजी हवे आहेत’, CM Devendra Fadnavis यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल, संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सुनावलं!
2

‘देशाला मोदीजी हवे आहेत’, CM Devendra Fadnavis यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल, संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सुनावलं!

‘भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’, Harshvardhan Sapkal यांचा फडणवीसांवर घणाघात! PM मोदी, अमित शाहांनासुद्धा घेरलं
3

‘भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’, Harshvardhan Sapkal यांचा फडणवीसांवर घणाघात! PM मोदी, अमित शाहांनासुद्धा घेरलं

Sanjay Raut : अमित शाहांना गृहमंत्रिपदावरून हटवा! संजय राऊतांची मोदींकडे मोठी मागणी; 13 कोटी घुसखोरांच्या मुद्द्यावरून थेट सवाल
4

Sanjay Raut : अमित शाहांना गृहमंत्रिपदावरून हटवा! संजय राऊतांची मोदींकडे मोठी मागणी; 13 कोटी घुसखोरांच्या मुद्द्यावरून थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.