Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मोदीजी, देश तुम्हाला प्रश्न विचारतोय,” NEET पेपरफुटीवरून राहुल गांधी आक्रमक

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत "मोदीजी, देश तुम्हाला प्रश्न विचारतोय," अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 17, 2026 | 09:16 PM
Rahul Gandhi slams PM Narendra Modi

Rahul Gandhi slams PM Narendra Modi

Follow Us
Close
Follow Us:
  • NEET पेपरफुटी प्रकरणानंतर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला धरले धारेवर
  • “मोदीजी, देश तुम्हाला प्रश्न विचारतोय,” अशी राहुल गांधी यांची संतप्त भावना
  • शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. भविष्यातील डॉक्टर्स बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे यामुळे आतोनात नुकसान झाले आहे. सीबीआयची या प्रकरणात कसून चौकशी सुरु असून अनेकांना अटक करण्यात आली आहे. अश्यातच आता काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत “मोदीजी, देश तुम्हाला प्रश्न विचारतोय,” अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

देशभरातील ३ मे रोजी वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा पेपर देशभरात घेण्यात येणार होता. मात्र परीक्षेपूर्वी पेपर फुटल्याने एनटीएने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी यावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत, “देशात पुन्हापुन्हा पेपर लीक का होत आहेत? या ‘परीक्षा पे चर्चा’ वर तुम्ही शांत का आहात? सारखे सारखे अपयशी ठरलेल्या शिक्षण मंत्र्यांना तुम्ही बरखास्त का करत नाहीत?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

“महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारने एवढं केलं नसेल,” जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून फडणवीसांचे खडेबोल

राहुल गांधींची ‘X’ वरून टीकेची झोड

राहुल गांधी आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून म्हणाले, “२०२४ मध्ये NEET पेपर लीक झाला. परीक्षा रद्द झाली नाही मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. सीबीआयने चौकशी सुरु केली. एक कमिटी बनवण्यात आली. २०२६ मध्ये पुन्हा NEET पेपर लीक झाला. परीक्षा रद्द झाली. मंत्र्यांनी पुन्हा राजीनामा दिला नाही. पुन्हा सीबीआय चौकशी करत आहे. आता पुन्हा एक कमिटी बनवण्यात येईल. मोदीजी, देश तुम्हाला काही प्रश्न विचारत आहे… उत्तर द्या… पुन्हा पुन्हा पेपर लीक का होत आहेत? पुन्हा पुन्हा या ‘परीक्षा पे चर्चा’ वर तुम्ही शांत का आहात? पुन्हा पुन्हा अपयशी ठरलेल्या शिक्षण मंत्र्यांना तुम्ही बरखास्त का करत नाहीत?” असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

NEET 2024:
पेपर लीक हुआ। परीक्षा रद्द नहीं हुई। मंत्री ने इस्तीफ़ा नहीं दिया। CBI ने जांच बिठाई। एक कमेटी बनी।
NEET 2026:
पेपर लीक हुआ। परीक्षा रद्द हुई। मंत्री ने फिर इस्तीफ़ा नहीं दिया। CBI फिर जाँच कर रही है। एक और कमेटी बनेगी।
मोदी जी, देश आपसे कुछ सवाल पूछ रहा है – जवाब… — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 17, 2026

आपल्या दुसऱ्या ‘X’ पोस्टवरून ते म्हणाले, “आधी नीट पेपरफुटी, ज्याचा परिणाम २२ लाख विद्यार्थ्यांवर झाला. त्यानंतर सदोष ओएसएम प्रणालीमुळे सीबीएसईच्या इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना अनपेक्षितपणे कमी गुण मिळाले – ज्यामुळे अनेकांनी आपली महाविद्यालयीन पात्रता गमावली. आता सीबीएसईच्या इयत्ता ९वीच्या लाखो विद्यार्थ्यांना १ जुलैपासून अचानक एक नवीन भाषा शिकायला सांगितले आहे, त्यासाठी शिक्षक नाहीत, पाठ्यपुस्तके नाहीत आणि एक “संक्रमणकालीन” उपाय म्हणून १४ वर्षांच्या मुलांना इयत्ता ६ वीची पुस्तके दिली जात आहेत.”

First the NEET paper leak affecting 22 lakh students. Then CBSE Class 12 students receiving unexpectedly low marks from a broken OSM system – many losing their college eligibility. Now lakhs of CBSE Class 9 students suddenly asked to learn a new language from July 1, with no… — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 17, 2026

“तीन परीक्षा. तीन वयोगट. एक मंत्री. धर्मेंद्र प्रधानजी एकटेच अपयशी ठरलेले नाहीत. ते भारतातील विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वयोगटात एकाच वेळी अपयशी ठरले आहेत. प्रत्येक घोषणा मुलांना अनिश्चिततेच्या गर्तेत अधिक खोलवर ढकलत आहे. प्रत्येक अपयशाला शिक्षा होत नाही. शिक्षण मंत्रालय हे आपत्तींचे खाते बनले आहे. पंतप्रधान मोदीजी – तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांनी ज्या लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे, त्यांची तुम्ही किमान माफी तरी मागू शकता का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Breaking News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात ‘या’ तारखेपासून होणार कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Web Title: Rahul gandhi slams pm narendra modi over neet paper leak case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • narendra modi
  • NEET exam scam
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

India Netherlands Deals : सेमीकंडक्टर ते हरित उर्जा…, भारत-नेदरलँड्समध्ये १७ सामंजस्य करार; द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा मिळणार
1

India Netherlands Deals : सेमीकंडक्टर ते हरित उर्जा…, भारत-नेदरलँड्समध्ये १७ सामंजस्य करार; द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा मिळणार

NEET Paper leak Case: धर्मेंद्र प्रधान यांना त्वरित पदावरून हटवा, NEET पेपरफुटीवरून राहुल गांधी यांची मागणी
2

NEET Paper leak Case: धर्मेंद्र प्रधान यांना त्वरित पदावरून हटवा, NEET पेपरफुटीवरून राहुल गांधी यांची मागणी

‘जग मोठ्या संकटात…’; पंतप्रधान मोदींचा कोविड, युद्ध अन् ऊर्जा संकटावर इशारा, भारतासाठी चार महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा
3

‘जग मोठ्या संकटात…’; पंतप्रधान मोदींचा कोविड, युद्ध अन् ऊर्जा संकटावर इशारा, भारतासाठी चार महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा

“जसे मोदींचे एपस्टीनशी संबंध तसेच महाराष्ट्र भाजपचे खरातशी संबंध,” सुजात आंबेडकरांची जहरी टीका
4

“जसे मोदींचे एपस्टीनशी संबंध तसेच महाराष्ट्र भाजपचे खरातशी संबंध,” सुजात आंबेडकरांची जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.