Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : रायगडमध्ये महायुतीत पुन्हा ठिणगी! महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, ‘जशास तसं उत्तर देऊ’

खालापूरमधील रोजगार आंदोलनावरून रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा जुंपली आहे. आमदार महेंद्र थोरवेंनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर कंपन्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करत ‘जशास तसं उत्तर देऊ’ असा इशारा दिला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 12, 2026 | 06:13 PM
रायगडमध्ये महायुतीत पुन्हा ठिणगी! महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

रायगडमध्ये महायुतीत पुन्हा ठिणगी! महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • खालापूर रोजगार आंदोलनावरून महायुतीत पुन्हा आरोप-प्रत्यारोप
  • महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर कंपन्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप
  • ‘कंपन्या बंद पाडण्याचा प्रयत्न झाला तर जशास तसं उत्तर देऊ’, थोरवेंचा इशारा
 

Raigad News : रायगड जिल्ह्यात महायुतीच्या गोटात सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांना आता चांगलीच धार आली आहे. खालापूरमधील रोजगाराच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादात कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

खालापूरमधील स्थानिक तरुणांना कंपन्यांमध्ये रोजगार मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनावर टीका करताना थोरवेंनी हा प्रकार म्हणजे स्वतःची झोळी भरण्यासाठी केलेली स्टंटबाजी असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांत हा प्रकार नेमका काय होता, हे सगळ्यांच्या लक्षात येईल, असंही त्यांनी सुनावलं.

“खालापूरमधील कंपन्यांना राष्ट्रवादीकडून त्रास देण्याचं काम”

महेंद्र थोरवे एवढ्यावरच थांबले नाहीत. खालापूरमधील कंपन्यांना राष्ट्रवादीकडून त्रास देण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिकांना रोजगार देण्यासाठी कंपन्या काम करत असताना त्या बंद पाडण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर त्याला ‘जशास तसं उत्तर देऊ’, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

Manoj Jarange On ED Notice: मुंबईच्या आंदोलनापूर्वी मराठा आंदोलकांना ईडीच्या नोटीसा..; जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

या सगळ्या वादामुळे रायगडमध्ये महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच रोजगार आंदोलनावरून राष्ट्रवादीकडून कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनीही हस्तक्षेप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती.

रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर

दरम्यान, रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष काही नवा नाही. पालकमंत्रीपद, विधान परिषद निवडणूक, स्थानिक राजकारण आणि विकासकामांच्या श्रेयावरून दोन्ही पक्षांमध्ये यापूर्वीही खटके उडाले आहेत.

विधान परिषद निवडणुकीच्या वेळी शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, त्यानंतरही दोन्ही पक्षांमधील राजकीय कुरघोडी थांबताना दिसत नाही.

आता महेंद्र थोरवे यांच्या ताज्या आरोपांमुळे रायगडमधील महायुतीतील वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. थोरवेंच्या आरोपांवर राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Maratha Reservation : जरांगे मुंबईत धडकणार, सरकारची भूमिका स्पष्ट; प्रवीण दरेकर म्हणाले, ‘सरकार चर्चेसाठी तयार’

Web Title: Raigad news raigad politics mahendra thorve sunil tatkare ncp shivsena clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Mahendra Thorve
  • Raigad News
  • sunil tatkare

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.