
Raj Thackeray and Uddhav Thackeray alliance announced on December 24 tweets Sanjay Raut
मुंबई पालिका निवडणुकीची घोषणा झाली असून आजपासून उमेदवारांचे अर्ज दाखल प्रक्रिया सुरु झाली आहे. यानंतर आता ठाकरे बंधू कधी युती जाहीर करणार याची उत्सुकता लागली होती. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युती जाहीर केली आहे. ‘उद्या १२ वाजता’ असे सूचक ट्वीट करत खासदार संजय राऊत यांनी युतीची घोषणा केली आहे.
उद्या
१२ वाजता pic.twitter.com/ob47tQxhGG — Sanjay Raut (@rautsanjay61) December 23, 2025
हे देखील वाचा : राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुराळा; जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार
मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. देशाची अर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मागील 25 वर्षांची सत्ता कायम राखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने मनसे पक्षासोबत युती केली. मागील सर्व हेवेदावे विसरुन ठाकरे बंधू हे एकत्रित आले आहेत. यापूर्वी हिंदी सक्तीवरुन एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी आता निवडणुकीमध्ये देखील एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मराठी मतांचे विभाजन रोखण्यासाठी आणि मराठी मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ठाकरे बंधूंसमोर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे मुंबई पालिका निवडणुकीमध्ये मोठा ट्वीस्ट येणार आहे.
हे देखील वाचा : पुण्यात राजकीय खलबतं? दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची “गुप्त बैठक” सुरू
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंमध्ये सर्व जागांच्या वाटपाबाबत अंतिम चर्चा झाली असून जागावाटप संपले असल्याचे जाहीर केले. खासदार राऊत म्हणाले की, “काल रात्री जागा वाटप पूर्ण झालंय.शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहेत. कोणाच्या मनात संभ्रम नाही. तशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. एकत्र येऊन सर्व कामाला लागले आहेत. मनोमिलन झालेलं असून जागावाटपवर काल रात्री शेवटचा हात फिरवला गेला,” असं संजय राऊतांनी सांगितले.