Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET पेपरफुटीवरून Raj Thackeray भडकले,”सरकारची लोकांना वेठीस धरण्याची परंपरा, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!”

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याप्रकरणावरून मोठे भाष्य करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. "केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे," अश्या शब्दांत त्यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला

  • By विवेक
Updated On: May 14, 2026 | 05:45 PM
Raaj Thackeray demands resignation of Dharmendra Pradhan over NEET Paper leak

Raaj Thackeray demands resignation of Dharmendra Pradhan over NEET Paper leak

Follow Us
Follow Us:
  • मनसेप्रमुख राज ठाकरे यांची “X” वरून NEET पेपरफुटी प्रकरणी पोस्ट
  • ‘२०१६ ला ‘NEET’ लादण्याची गरजच काय?’ राज ठाकरेंचा सरकारला सवाल
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा – राज ठाकरे
NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात खळबळ उडाली असून लाखो विद्यार्थ्याचे भविष्य टांगणीला लागले आहे. केंद्र सरकारकडून परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. केंद्र सरकारकडूनदेखील याविषयी अतिशय गंभीर पावले उचलली जात असून आता थेट CBI कडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. अश्यातच आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याप्रकरणावरून मोठे भाष्य करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे,” अश्या शब्दांत त्यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत “X” अकाऊंटवरून NEET पेपरफुटी प्रकरणी पोस्ट करत चांगलेच ताशेरे ओढले. यावेळी ते म्हणाले, “केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे. ‘NEET’ पेपरफुटीने परत एकदा हे सिद्ध झालं. ‘NEET’ चा पेपर १० लाख रुपयांना विकत घेतला गेला. आणि याची मुळं सापडली महाराष्ट्रात. अर्थात हे पेपरफुटीचं जाळं देशव्यापी आहे. यांत ‘NEET’ साठी तयार करून घेणाऱ्या कोचिंग क्लासेसचा पण हात आहे. हे सगळं झाल्यावर केंद्र सरकारने काय केलं तर परीक्षा रद्द केली आणि सीबीआय चौकशी लावली. या आधी पण २०२४ ला सीबीआय चौकशी अशाच एका प्रकरणात लावली होती त्यातून काही साध्य झालं नाही. या सगळ्यात आपण आपलं काम केलं असा सरकारचा आविर्भाव आहे. पण २२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय ?” असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

‘२०१६ ला ‘NEET’ लादण्याची गरजच काय?’ राज ठाकरेंचा सरकारला सवाल

आपल्या ‘X’ पोस्टमध्ये ते पुढे म्हणाले, “मुळात २०१६ ला ‘NEET’ लादण्याची गरजच नव्हती. पण सगळं एकछत्री अंमलाखाली आणण्याची या सरकारची खुमखुमी इतकी तीव्र आहे की मग काही लाख लोकांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला तर काय फरक पडतो? ‘NEET’ बद्दल मी २०१६ पासून आक्षेप नोंदवत होतो. या परीक्षांमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आणि जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, ते महागडे कोचिंग क्लासेस लावणार. पुढे हे क्लासवाले आर्थिक शक्तीच्या जोरावर परीक्षांचे निकाल हवे तसे वाकवणार हे मला दिसत होतं आणि सामान्य घरातील मुलं,मुली भरडली जाणार हे मला दिसत होतं आणि म्हणून २०१६ पासून आम्ही याला विरोध करतोय.”

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय 

“उत्तरेतील विद्यार्थी दक्षिणेत घुसवण्यासाठी हा सगळा अट्टाहास” – राज ठाकरे

ते पुढे म्हणाले, “माझ्या सारखाच विरोध दक्षिणेतील नेत्यांनी पण केला. सध्याचे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय पण ‘NEET’ रद्द करा म्हणून आग्रह धरत आहेत. कारण दक्षिणेतील ५ राज्य आणि महाराष्ट्र मिळून जवळपास ३५० च्या वर मेडिकल कॉलेजेस आहेत आणि वरती उत्तरेतली मोठ्या राज्यांमध्ये फक्त १८० मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यामुळे उत्तरेतील विद्यार्थी दक्षिणेत घुसवण्यासाठी हा सगळा अट्टाहास २०१६ पासून सुरु आहे. आणि त्यासाठी कोचिंग क्लासेसचं सगळ्यात मोठं जाळं उत्तरेतल्या राज्यांत आहे. आणि व्यवस्था कशी वाकवायची हे त्यांना नीट माहित आहे. प्रश्न इतकाच आहे की अशा सडलेल्या व्यवस्थेतून जे डॉक्टर्स बाहेर पडतील त्यांच्या हातात आपण आपलं आरोग्य देणार आहोत का ? आणि का तर केंद्राला वाटलं की यापुढे मेडिकल प्रवेशासाठी एकच परीक्षा हवी म्हणून? आधी प्रत्येक राज्याची एक परीक्षा होती, त्याच्या आधी तर बारावीच्या मार्कांवर प्रवेश मिळायचा. समजा त्यात काही त्रुटी होत्या असं मान्य करू, मग त्या सुधारायच्या सोडून जी ‘NEET’ परीक्षा आणली ती अजून भीषण निघाली. या परीक्षेत कधी काही विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाल्याची उदाहरणं आहेत जे अशक्य वाटतं, कधी परस्पर ग्रेस मार्क्स दिलेत. थोडक्यात काय ज्याच्याकडे व्यवस्था वाकवायची शक्ती आहे त्याला पायघड्या घातल्या जाणार. सध्याचं सरकारचं बरं आहे की आमच्यासोबत आलात की तुम्ही स्वच्छ आणि आमच्या व्यवस्थेला एकदा शांत केलंत की मग तुम्ही काहीही करा.”

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा – राज ठाकरे

यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, “मुळात मेडिकलच्या जागा कमी. त्यासाठी राष्ट्रव्यापी परीक्षा. तिचं काय होईल माहित नाही. दरवर्षी काहीतरी नवीन खेळ. काही वर्षांपूर्वी ‘NEET’ परीक्षेच्या गोंधळावर मी थेट पंतप्रधानांशी बोललो होतो, तेंव्हा प्रश्न सुटला. पण कायमस्वरूपी काही सुधारणा नाही. इतकी वर्ष एकच माणूस धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून चिकटून बसलेत. त्यांच्या काळात ‘NEET’ मध्ये इतके घोळ झाले, पण तरीही हे महाशय तिथेच बसलेत. बहुदा हिंदी देशभर लादण्याचा अजेंडा ते नेटाने राबवत आहेत म्हणून त्यांना ही बक्षिसी दिली आहे का ? माझी पंतप्रधानांना विनंती आहे की २२ लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी अनेकदा खेळ करणाऱ्या तुमच्या या मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या.”

Sunil Shelke News: रोहित पवारांनी ‘भविष्यवाणीचा’ धंदा सुरू केलाय का? सुनील शेळके यांचा जळजळीत सवाल 

Web Title: Raj thackeray demands resignation of dharmendra pradhan over neet paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Dharmendra Pradhan
  • NEET Exam
  • neet paper leak
  • Raj Thackeary

संबंधित बातम्या

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते
1

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
2

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!
3

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!

NEET पेपरफुटीनंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; पहिल्यांदाच व्यक्त केली भूमिका, म्हणाले ‘माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही’
4

NEET पेपरफुटीनंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; पहिल्यांदाच व्यक्त केली भूमिका, म्हणाले ‘माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.