Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray : “आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही…”, विधानभवनातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले

Vidhan Bhavan Rada : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन विधानभवनात झालेल्या प्रकाराबाबत आगपाखड केली आहे. राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काय म्हणाले जाणून घेऊया...

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 18, 2025 | 11:41 AM
"आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही…", विधानभवनातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले

"आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही…", विधानभवनातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले

Follow Us
Close
Follow Us:

Raj Thackeray On Jitendra Awhad vs Gopichand Padalkar news in Marathi: महाराष्ट्राच्या राजकारण आता मुद्दावरून गुद्द्यावर आलं आहे. भाजपचे गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटातील जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या शिवीगाळीनंत आता गुरुवारी संध्याकाळी विधानसभेत दोघांच्याही कार्यकर्त्यांच्या हाणामारी पाहायला मिळाल्या. त्यानंतर त्यांचे पडसाद मध्यरात्री 1.30 नंतर विधान भवनात उमटले. आता याच प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘ काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?, कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र? अशी उद्गिग्न प्रतिक्रिया विधानभवनातल्या हाणामारीवर राज ठाकरेंनी दिली आहे. वाट्टेल त्या लोकांना पक्षात घेण्यानं असं घडतंय, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

पडळकर-आव्हाड वादाचा परिणाम? नताशा आव्हाडांवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट

पोस्टमध्ये राज ठाकरे काय म्हणाले?

काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ‘ काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?’

सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, ‘कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?’

मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय?

काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ‘ काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?’

सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे…

— Raj Thackeray (@RajThackeray) July 18, 2025

अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये… सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही !

माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारणांच्यात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.

“… तर कशाला आमदार राहायचे?”; विधानभवनातील राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

Web Title: Raj thackeray on jitendra awhad vs gopichand padalkar vidhan bhavan rada maharashra politics news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • gopichand padalkar
  • Jitendra Awhad
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Amit Thackeray News: ‘मराठा आंदोलकांना तातडीने अन्न-पाणी पुरवा…’: जरांगेंच्या टीकेनंतर अमित ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन
1

Amit Thackeray News: ‘मराठा आंदोलकांना तातडीने अन्न-पाणी पुरवा…’: जरांगेंच्या टीकेनंतर अमित ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन

Raj Thackeray News: ‘याचं उत्तर एकनाथ शिंदेंच देऊ शकतात’; मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचे सूचक विधान
2

Raj Thackeray News: ‘याचं उत्तर एकनाथ शिंदेंच देऊ शकतात’; मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचे सूचक विधान

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर कुटुंबासह ‘शिवतीर्थ’ वर; राज ठाकरेंसह केली बाप्पाची पूजा
3

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर कुटुंबासह ‘शिवतीर्थ’ वर; राज ठाकरेंसह केली बाप्पाची पूजा

“ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत…फडणवीस नाहीत; खासदार संजय राऊत स्पष्टच म्हणाले
4

“ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत…फडणवीस नाहीत; खासदार संजय राऊत स्पष्टच म्हणाले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.