Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बहुमत असूनही भाजपला धक्का! काँग्रेस, राष्ट्रवादीची मोठी खेळी; जतमध्ये नेमकं काय घडलं?

जत नगरपरिषदेच्या विषय समिती तसेच सभापती निवडीत मंगळवारी राजकीय नाट्य रंगले. स्पष्ट बहुमत असूनही भारतीय जनता पार्टीला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 29, 2026 | 03:30 PM
बहुमत असूनही भाजपला धक्का! काँग्रेस, राष्ट्रवादीची मोठी खेळी; जतमध्ये नेमकं काय घडलं?

बहुमत असूनही भाजपला धक्का! काँग्रेस, राष्ट्रवादीची मोठी खेळी; जतमध्ये नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:
  • बहुमत असूनही भाजपला धक्का!
  • काँग्रेस, राष्ट्रवादीची मोठी खेळी
  • जतमध्ये नेमकं काय घडलं?
जत : जत नगरपरिषदेच्या विषय समिती तसेच सभापती निवडीत मंगळवारी राजकीय नाट्य रंगले. स्पष्ट बहुमत असूनही भारतीय जनता पार्टीला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची साथ घेत चतुर राजकीय खेळी करत स्वतःसह राष्ट्रवादीच्या पदरातही प्रत्येकी एक सभापती पद पाडून घेतले. परिणामी भाजपला दोन महत्त्वाच्या सभापती पदांपासून वंचित राहावे लागले.

 

नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांच्या अध्यक्षतेखाली विषय समिती सभापती निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या सभेत सुरुवातीपासूनच तणावपूर्ण वातावरण होते. एका अपक्ष नगरसेवकासह भाजपकडे बहुमत असल्याने सर्व विषय समित्यांवर भाजपचाच वरचष्मा राहील, अशी जोरदार चर्चा होती. विशेषतः उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने भाजपच्या बाजूने मतदान केल्यामुळे भाजपला सर्वच समित्या मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

मात्र, ऐनवेळी काँग्रेसने राजकीय डावपेच आखत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना सोबत घेत समीकरण बदलले. या अनपेक्षित हालचालीमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आणि सभापती पदांचे गणित पूर्णपणे उलटले. काँग्रेसला महिला व बालविकास समितीचे सभापती पद मिळाले, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने शालेय शिक्षण समितीचे सभापती पद आपल्या पदरात पाडून घेतले.

मंगळवारी झालेल्या विषय समिती सभापतींची निवड पुढीलप्रमाणे

  • स्वच्छता व आरोग्य समिती : गौतम ऐवळे (भाजप)
  • सार्वजनिक बांधकाम समिती : मिथून भिसे (भाजप)
  • पाणीपुरवठा व जलनिसारण समिती : फिरोज नदाफ (अपक्ष)
  • महिला व बालविकास समिती : सुप्रिया बामणे (काँग्रेस)
  • शालेय शिक्षण समिती : इम्रान गवंडी (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट)
  • तर नियमाप्रमाणे विकास व नियोजन समिती ही उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांच्याकडे राहिली आहे.
  • काँग्रेसच्या यशस्वी खेळीमुळे दोन सभापती पदांवर फिरले पाणी
भाजपाकडे बहुमत असतानाही काँग्रेसच्या यशस्वी खेळीमुळे दोन सभापती पदांवर पाणी फिरले आहे. याशिवाय अपक्ष नगरसेवकाची साथ मिळवण्यासाठी त्यांना सभापती पद देण्याचा शब्द दिल्याने भाजपाला आणखी एक पद सोडावे लागले. परिणामी भाजपच्या पदरात केवळ दोनच सभापती पदे राहिली. या निकालामुळे जत नगरपरिषदेच्या राजकारणात नव्या चर्चा रंगल्या असून, आगामी काळात नगरपरिषदेत निर्णय घेताना सत्ताधारी भाजपाला विरोधकांच्या या नव्या एकजुटीचा सामना करावा लागणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

Web Title: Congress and ncp have given a blow to bjp in the subject committee elections of jat nagarparishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • BJP
  • gopichand padalkar
  • Jatt
  • NCP News

संबंधित बातम्या

दिवे गराडेमध्ये भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार; नागरिकांकडून जल्लोषात स्वागत
1

दिवे गराडेमध्ये भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार; नागरिकांकडून जल्लोषात स्वागत

काँग्रेस, आपची दाणादाण! ‘या’ महानगरपालिका निवडणुकीत BJP ने मिळवला विजय
2

काँग्रेस, आपची दाणादाण! ‘या’ महानगरपालिका निवडणुकीत BJP ने मिळवला विजय

Ajit Pawar Plane Crash: “…पान भर जाहिराती दिल्याने काय होणार?”; राऊतांचा भाजपवर निशाणा
3

Ajit Pawar Plane Crash: “…पान भर जाहिराती दिल्याने काय होणार?”; राऊतांचा भाजपवर निशाणा

महिलांना साड्या वाटून तालुक्याचा विकास करणार का? सुरेखा ढवळे यांचा विरोधकांना सवाल
4

महिलांना साड्या वाटून तालुक्याचा विकास करणार का? सुरेखा ढवळे यांचा विरोधकांना सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.