Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdas Athawale : ‘उरलेल्यांनी रिपब्लिकन पक्षात यावे’; टीएमसीच्या खासदार-आमदारांना आठवलेंचे आवाहन

पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींवर भाष्य करत रामदास आठवले यांनी तृणमूल काँग्रेसच्या उर्वरित खासदार आणि आमदारांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले. त्यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 15, 2026 | 09:35 PM
उरलेल्यांनी रिपब्लिकन पक्षात यावे'; टीएमसीच्या खासदार-आमदारांना आठवलेंचे आवाहन

उरलेल्यांनी रिपब्लिकन पक्षात यावे'; टीएमसीच्या खासदार-आमदारांना आठवलेंचे आवाहन

Follow Us
Follow Us:

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अश्यातच, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) उर्वरित खासदार आणि आमदारांना रिपब्लिकन पक्षात (RPI) प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे. तृणमूल काँग्रेसमधील कथित बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

रामदास आठवले यांनी म्हटले की, “तृणमूल काँग्रेसचे काही खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आधी मिळाली असती तर त्यांनी त्यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असलेल्या रिपब्लिकन पक्षात तृणमूल काँग्रेसच्या उर्वरित खासदारांनी सहभागी व्हावे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दावा केला की, “तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी पक्षाचे नेतृत्व सोडून स्वतंत्र राजकीय भूमिका स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित खासदारांनीही रिपब्लिकन पक्षात प्रवेश करण्याचा विचार करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

आमदारांनाही दिले निमंत्रण

रामदास आठवले यांनी केवळ खासदारांनाच नव्हे तर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनाही रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले. तृणमूल काँग्रेसविरोधात भूमिका घेणाऱ्या आमदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित राजकारणासाठी RPI मध्ये सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले.

ठाकरे गटाचे खासदार फुटणार? ‘ऑपरेशन टायगर’ बद्दल उदय सामंतांचे मोठे वक्तव्य

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर निशाणा

आठवले यांनी तृणमूल काँग्रेसमधील असंतोषासाठी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वशैलीला जबाबदार धरले. त्यांच्या नेतृत्वाखालील दबावामुळे अनेक लोकप्रतिनिधी उघडपणे भूमिका घेऊ शकत नव्हते, असा दावा त्यांनी केला. मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत काही खासदार आणि आमदारांनी वेगळी वाट निवडल्याचे त्यांनी नमूद केले.

तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करताना रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा उर्वरित खासदार आणि आमदारांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले. त्यांच्या या विधानानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणातील घडामोडींवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Aaditya Thackeray : आमच्या खासदारांवर आमचा अंधविश्वास; ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Web Title: Ramdas athawale invites tmc mps mlas to join rpi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • mamta banerjee
  • Ramdas Athawale
  • TMC

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.