Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘उद्धव ठाकरेंना जळी स्थळी काष्ठी पाषाणी शिंदेच दिसतात’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

एकनाथ शिंदे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला रामदास कदमांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी एकनाथ शिंदेच दिसतात, असा टोला त्यांनी लगावला.

  • By विवेक
Updated On: Aug 08, 2026 | 07:07 PM
Ramdas kadam

Ramdas kadam

Follow Us
Follow Us:
  • एकनाथ शिंदेंच्या मोदी भेटीवरून रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
  • आदित्य ठाकरेंच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटींचा कदमांनी दिला दाखला
  • “तुम्ही गद्दार म्हणत राहा, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत”
 

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्षावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी एकनाथ शिंदेच दिसत आहेत, तुम्ही गद्दार म्हणत राहा तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार – खासदार वाढतायेत,” असा टोला रामदास कदम यांनी लगावला. “एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटले म्हणजे मोदी त्यांचे बॉस झाले का? मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी तुमचे बॉस झाले होते का?” असा प्रतिप्रश्न करत कदमांनी ठाकरेंवर निशाणा साधला. राज्याचा उपमुख्यमंत्री विकासकामांसाठी पंतप्रधानांची भेट घेऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आदित्य ठाकरेंच्या भेटींचा दाखला देत पलटवार

उद्धव ठाकरे यांनी टीका करण्यापेक्षा आपण बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असल्याची जाणीव ठेवावी आणि आम्ही कामातून उत्तर देऊ, असे रामदास कदम म्हणाले.

काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विधानावरून मोठे वक्तव्य

यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भाजप नेत्यांसोबत झालेल्या भेटींचाही दाखला दिला. अधिवेशनाच्या काळात आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांची बुके देऊन भेट घेतल्याचा दावा कदमांनी केला. “मग फडणवीस आणि इतर नेते तुमच्या पिल्लाचे बॉस झाले का?” असा खोचक सवाल त्यांनी केला. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडे असतात, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावे, असा सल्लाही कदमांनी दिला.

“तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत”

उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केवळ द्वेष असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणत राहा, मात्र तुमचा पक्ष संपत चालला असून शिंदे गटाचे आमदार आणि खासदार वाढत आहेत, असा दावा त्यांनी केला.

‘Gen Z शी बोलण्याआधी अमित शाहांचा राजीनामा घ्या’; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना खोचक टोला

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करताना “चिंता करू नका, मी तुमच्या पाठिशी आहे” हा संदेश नेमका कोणाला दिला, असा सवाल केला होता. गद्दारांना आता नेमकी कसली भीती वाटते, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी हा संपूर्ण घटनाक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे म्हटले होते. याच टीकेवरून आता शिंदे गटाकडून पलटवार करण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

Web Title: Ramdas kadam targets uddhav thackeray over eknath shinde pm modi meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ramdas Kadam
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
1

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार
3

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन
4

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.