रोहित पवारांची एक्सवर पोस्ट (फोटो - सोशल मीडिया)
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाल्यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अनेकांनी रोहित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. यावर प्रतिक्रिया देत रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी लिहिले, “अजितदादांच्या अपघातात दोषी असलेल्या VSR कंपनीला क्लिनचिट देण्यासाठी सध्या भलतीच घाई सुरूय. ४० पैशांच्या ट्रोलर्स गँगपासून तर अनेक आमदार-मंत्र्यांपर्यंत सगळेच एकसुरात या कंपनीची पाठराखण करतायेत. एवढा आटापिटा एका कंपनीसाठी करण्यापेक्षा अजितदादांना न्याय मिळण्यासाठी केला असता तर महाराष्ट्राला नक्कीच अभिमान वाटला असता.”
पुढे त्यांनी लिहिले, “दादांना न्याय देण्याऐवजी संपूर्ण सरकारी यंत्रणा एका कंपनीसाठी कामाला लागली असेल, तर VSR आणि ‘त्यांचे’ नेमके काय लागेबांधे आहेत आणि कसे घनिष्ठ संबंध आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. या कंपनीची वकिली करताना स्वाभिमानाचं विसर्जन केलेल्या एका अंधभक्त मंत्र्याने तर चक्क माझी ‘नार्को टेस्ट’ करण्याची मागणी केली. पण माझं सरकारला थेट आव्हान आहे, बिलकूल वेळ दवडू नका, आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा!”
पुढे रोहित पवारांनी लिहिले, ही नार्को टेस्ट करताना अट एकच आहे की, माझ्यासोबत ‘त्यांची’ देखील नार्को टेस्ट करा, म्हणजे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होऊन जाईल. मी कधीही तयार आहे… पण सत्य समोर येण्याच्या भीतीने ‘ते’ या अग्निपरिक्षेला तयार होतील का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
अजितदादांच्या अपघातात दोषी असलेल्या VSR कंपनीला क्लिनचिट देण्यासाठी सध्या भलतीच घाई सुरूय. ४० पैशांच्या ट्रोलर्स गँगपासून तर अनेक आमदार-मंत्र्यांपर्यंत सगळेच एकसुरात या कंपनीची पाठराखण करतायेत. एवढा आटापिटा एका कंपनीसाठी करण्यापेक्षा अजितदादांना न्याय मिळण्यासाठी केला असता तर महाराष्ट्राला नक्कीच अभिमान वाटला असता. पण दादांना न्याय देण्याऐवजी संपूर्ण सरकारी यंत्रणा एका कंपनीसाठी कामाला लागली असेल, तर VSR आणि ‘त्यांचे’ नेमके काय लागेबांधे आहेत आणि कसे घनिष्ठ संबंध आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. या कंपनीची वकिली करताना स्वाभिमानाचं विसर्जन केलेल्या एका अंधभक्त मंत्र्याने तर चक्क माझी ‘नार्को टेस्ट’ करण्याची मागणी केली. पण माझं सरकारला थेट आव्हान आहे, बिलकूल वेळ दवडू नका, आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा! पण अट एकच… माझ्यासोबत ‘त्यांची’ देखील नार्को टेस्ट करा, म्हणजे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होऊन जाईल.
मी कधीही तयार आहे… पण सत्य समोर येण्याच्या भीतीने ‘ते’ या अग्निपरिक्षेला तयार होतील का? #AjitdadaPawar
#JusticeForAjitdada — Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2026
रोहित पवार यांनी यशवंतराव चव्हाण केंद्रावर पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी सविस्तर सादरीकरण केले. यापूर्वी पुणे-मुंबईत सर्वत्र मफलरचे चित्र असलेले होर्डिंग्ज लावण्यात आले होते, ज्यामुळे हा ‘मफलरवाला’कोण आहे याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. पत्रकार परिषदेत जाहीरपणे दाखवून की तो ‘मफलरवाला’दुसरे कोणी नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, रोहित पवार यांनी संशयाची सुई फडणवीस यांच्याकडे वळवली आहे. फडणवीसांवर आरोप केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Ans: रोहित पवार VSR कंपनीवर कारवाई आणि अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहेत.
Ans: ‘माझी आजच नार्को टेस्ट करा; मात्र माझ्यासोबत त्यांचीही नार्को टेस्ट करा,’ असे आव्हान रोहित पवारांनी दिले आहे.
Ans: रोहित पवार यांनी यशवंतराव चव्हाण केंद्रात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली.






