Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Parishad Election: ठाणे एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांना शिवसेनेची उमेदवारी

Vidhan Parishad Election: राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवारांबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 01, 2026 | 09:53 AM
Thane Politics, Eknath Shinde, Ravindra Phatak, ShivSena, MLC Election,

Thane Politics, Eknath Shinde, Ravindra Phatak, ShivSena, MLC Election,

Follow Us
Follow Us:

Vidhan Parishad Election: ठाणे विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर शिवसेनेने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. शिंदे गटाकडून ठाण्यातून माजी आमदार रवींद्र फाटक यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेसाठी विविध नावांची चर्चा सुरू होती. विशेषतः हितेंद्र ठाकूर यांचे नावही चर्चेत होते. मात्र, अखेर पक्षाने रवींद्र फाटक यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला.

ठाण्यातील टेंभी नाका येथील ‘आनंद आश्रम’ या पक्ष कार्यालयात वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फाटक यांना उमेदवारी अर्ज सुपूर्द करण्यात आला. या निर्णयामुळे ठाण्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारी सुरू केली आहे.

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र फाटक दुपारी १२ वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर आता उमेदवारांच्या घोषणांना वेग आला असून ठाणे विधान परिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाणे मतदारसंघावर आपला दावा कायम राखत फाटक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ठाण्यातील निवडणुकीची रंगत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधान परिषद निवडणूक : शिवसेनेच्या उमेदवारांबाबत उत्सुकता; अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवारांबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला मिळालेल्या चार जागांसाठी संभाव्य उमेदवारांची नावे समोर येत आहेत.

ठाणे-पालघर मतदारसंघातून रवींद्र फाटक आणि क्षितिज ठाकूर यांच्या नावांची चर्चा सुरू होती. पण रवींद्र फाटक यांना उमेदवारीचा अर्ज दिल्यानंतर आता त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. दुसरीकडे परभणी-हिंगोली मतदारसंघातून अभिमन्यू खोतकर आणि बिप्लव बजोरिया यांची नावे चर्चेत आहेत.

JEE Advanced Result 2026: आज सकाळी १० वाजता निकाल; तुमची रँक कशी तपासणार?

नाशिक मतदारसंघासाठी हेमंत गोडसे, सईद खान आणि भाऊसाहेब चौधरी यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून किरण पांडव यांच्याही नावांची चर्चा आहे.

दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा अंतिम निर्णय आज वर्षा निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वाट्याला अखेरीस चार जागा येणार की पाच, तसेच कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अंतिम जागावाटप आणि उमेदवारांच्या घोषणेनंतर विधान परिषद निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार असून महायुतीतील अंतर्गत समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title: Ravindra phatak gets ticket for legislative council polls from cm eknath shindes shivsena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 09:53 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.