Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपला मोठा धक्का; मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेची खासदारकीही सोडली

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारमध्ये पाच वर्षे काम करणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता. ज्या कामामुळे त्यांना सार्वजनिक जीवनात येण्याची प्रेरणा मिळाली, त्या कामाकडे आता त्यांना परतायचे आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 14, 2026 | 11:14 AM
भाजपला मोठा धक्का; मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेची खासदारकीही सोडली

भाजपला मोठा धक्का; मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेची खासदारकीही सोडली

Follow Us
Follow Us:
  • मंत्रिपदाचा आणि राज्यसभा सदस्यात्वाचा एकाचवेळी राजीनामा
  • किरेन रिजिजू यांनी घेतली मुरुगन यांची भेट
  • राजीनाम्याचे कारणही आलं समोर
नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आपल्या मंत्रिपदाचा आणि राज्यसभा सदस्यात्वाचा एकाच वेळी राजीनामा दिला आहे. मुरुगन हे गेल्या अनेक काळापासून केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. ते माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह संसदीय बाबींच्या मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळत होते.

२०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी तमिळनाडूमध्ये भाजपला बळकट करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ‘एक्स’वर पोस्ट करत मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. एका मजुराच्या मुलापासून ते केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्यापर्यंतचा प्रवास त्यांच्यासाठी भाग्याचा होता. आता तळागाळात परत जाऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहायचे आणि तमिळनाडूमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी पूर्ण वेळ द्यायचा आहे, असे मुरुगन यांनी स्पष्ट केले.

मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या एका सविस्तर पत्रात आपल्या भविष्यातील योजनांची रूपरेषाही मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आता त्यांना आपला संपूर्ण वेळ तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्यासाठी आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी करण्यासाठी द्यायचा आहे.

आणखी काय म्हटलंय पत्रात?

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारमध्ये पाच वर्षे काम करणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता. ज्या कामामुळे त्यांना सार्वजनिक जीवनात येण्याची प्रेरणा मिळाली, त्या कामाकडे आता त्यांना परतायचे आहे. त्यांनी म्हटले आहे की, तामिळनाडूमध्ये भाजपला मजबूत करणे आणि राज्यातील २०२९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाला तयार करणे हे त्यांचे प्राधान्य आहे.

किरेन रिजिजू यांनी घेतली मुरुगन यांची भेट

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन यांची भेट घेतली. रिजिजू यांनी या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी सांगितले की, या भेटीदरम्यान दोघांमध्ये सौहार्दपूर्ण आणि फलदायी चर्चा झाली.

Abhijeet Dipke Slams PM Modi : दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान

Web Title: Resignation of minister of state for parliamentary affairs l murugan nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 11:14 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.