Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांचा राजीनामा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. असे असताना कल्याण डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 22, 2025 | 07:33 PM
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांचा राजीनामा

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांचा राजीनामा

Follow Us
Close
Follow Us:

KDMC News In Marathi : एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण युवा सेना अधिकारी प्रतिक पाटील सह सात पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कल्याण-पक्षात सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण युवा सेना अधिकारी प्रतिक पाटील सह सात पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठविल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे.

“संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ …”; ‘शासन भिकारी’वरून सुप्रिया सुळेंची कोकाटेंवर सडकून टीका

युवा सेना जिल्हा प्रमुख प्रतिक पाटील हे २००७ साली भारतीय विद्यार्थी सेनेचे शाखा संघटक होते. त्यानंतर युवा सेनेच्या स्थापनेनंतर उपविभाग अधिकाी होते. त्यानंतर तालुका अधिकारी होते. २०२२ सालापासून पाटील हे युवा सेना जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत होते. विविध पदावर कार्यरत असलेल्या पाटील यांनी वेळोवेळी पक्षाच्या विविध आंदोलन मोर्चे यात सक्रीय सहभाग घेतला. २००९ सालापासून २०२४ सालापर्यंत झालेल्या विविध निवडणूकीत पक्षाचे काम केले. पक्षाचे काम करीत असताना माझ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ले ही झाले. न डगमगता पाटील यांनी पक्षाचे काम निष्ठेने केले.

२००२ साली पक्ष फूटीनंतरही माझी निष्ठा कायम राहिली. पक्ष बांधणीसाठी कल्याण लोकसभा मतदार संघात काम केले आहे, असे असताना २०२४ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीनंतर पक्षाकडून मला सातत्याने सापत्न वागणूक मिळाली. संघटनेतील गटबाजीमुळे माझी सातत्याने निराशा झाली. निष्ठेने काम करुनही आमच्या प्रयत्नांना न्याय मिळाला नाही. माझ्यासह माझ्या सहकारी वर्गासोबतही भेदभाव होत गेला. अशा परिस्थिती पक्षाचे काम करणे शक्य नाही. पक्षातील गटबाजी, सापत्न वागणूकीला कंटाळून पक्ष पदाचा राजीनामा पाटील यांनी दिला आहे. राजीनामा त्यांनी पक्षाचे युवा नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे दिला आहे. पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी परेश काळण, पंकज माळी, भावेश गायकर, प्रसाद टुकरुल आणि पायल शिंगोटे यांनी देखील पक्ष पदाचे राजीनामे दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस थकत कसे नाहीत, त्यांच्या कामाचा वेग अफाट; शरद पवारांकडून कौतुकाचा वर्षाव

Web Title: Resignation of the office bearers of the youth sena in kalyan dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 07:33 PM

Topics:  

  • BMC
  • KDMC
  • shivsena

संबंधित बातम्या

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
1

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन
2

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
3

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?
4

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.