Rohit Pawar is aggressive as CM Fadnavis deal with Indian companies during Davos visit
नाशिक : शरद पवार गटाचे नेत व आमदार रोहित पवार हे सध्या नाशिक दौऱ्यार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या रोहित पवार यांनी नाशिकमध्ये रणजी ट्रॉफीचे उद्घाटन केले. महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफी सामना होणार आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दावोस दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.
नाशिकमध्ये आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये हजेरी लावली. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणली असल्याचा दावा केला जात आहे. मात्र करार झालेल्या अनेक कंपनी या भारतीय कंपन्या असल्यामुळे रोहित पवार यांनी मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार रोहित पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यामध्ये जे महाराष्ट्रासाठी करार केले आहेत ते मी पाहिले आहेत. त्या गुंतवणूकी चांगल्याच आहेत. त्यांचे स्वागतच केले पाहिजे. मात्र या करारातून काही प्रश्न देखील उपस्थित होतात. ज्या कंपन्यांसोबत करार झाले आहेत ते आपल्या शेजारी आहेत. त्या कंपन्या आपल्या शेजारीच आहेत. त्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज आहे. महाराष्ट्रात हे करार केले असते तर ते लोकांना जास्त आवडले असते,” असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
पुढे रोहित पवार म्हणाले की, “ज्या कंपन्यांचे ऑफिस मुंबईला आहेत. त्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज आहे? तेथे जाऊन करार करण्याची काय गरज आहे? ज्या कंपन्यांशी करार झाला त्या कंपन्या चांगल्या आहेत. पण त्याची अंमलबजावणी होणार का?” असे अनेक प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी केलेला दावोस दौऱ्यावरुन राजकारण सुरु झाले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दावोस दौऱ्यावरुन राज्यामध्ये नेहमीच राजकारण रंगताना दिसते. यावेळी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तीन दिवसीय दवोस दौरा केला. यावेळी राज्यामध्ये 15.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणली असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र यातील अनेक कंपन्या या भारतीय असून इतर कंपन्यांचे ऑफिस हे मुंबईमध्ये आहेत. त्यामुळे या करारासाठी दावोसला जाण्याची गरज काय आहे? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
कोणत्या कंपन्यांसोबत झाले करार?
महाराष्ट्रामध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी करार झाले आहेत. दावोस दौऱ्यामध्ये कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांबरोबर झाले. लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.