rohit pawar target ajit pawar and eknath shinde after haryana elections
पुणे : जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणूक पार पडली. यानंतर हरयाणामध्ये भाजपचा विजय झाला असून कॉंग्रेसलच्या आशेवर पाणी फिरले. यावर आता आपल्या राज्यात देखील राजकीय वादविवाद सुरु झाले आहे. हरयाणामधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातीस महायुती देखील जोरदार कामाला लागली आहे. लवकरच आपल्या राज्यात देखील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे,
हरयाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा विजय झाला. मात्र मागील वर्षी भाजपने बहुमतासाठी जेजेपी पक्षासोबत युती केली होती. तेव्हा या पक्षाने हरयाणाच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र भाजपसोबत युती केलेल्या या जेजेपी पक्षाला यावेळी शून्य जागा मिळाल्या आहेत. स्वतः पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री राहिलेले असतानाही त्यांचा यावेळी पराभव झाला आहे. यावरुन आता महाराष्ट्रातील नेत्यांनी देखील धडा घ्यावा असा इशारा रोहित पवार यांनी अजित पवार व एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
हे देखील वाचा : ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर आऊट; तर शिंदे गटाच्या मेळाव्याच्या मैदानात बदल
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार माध्यमांशी संवाद साधून हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्षाला यावेळच्या निवडणुकीत शून्य जागा मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अमित शाहांनी महाराष्ट्र दौऱ्यात 2029 ला भाजपाचा मुख्यमंत्री स्वबळावर येईल, असे जाहीर केले आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातही भाजपाचे मित्रपक्ष संपवले जातील, हे सिद्ध होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हरयाणाच्या निकालातून खूप काही शिकले पाहिजे.”असा सल्ला रोहित पवार यांनी अजित पवार व एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
पक्षांतर शरद पवारांना सांगून – अजित पवार
“मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली, ती भूमिका मी साहेबांना सांगूनच घेतली. साहेब पहिल्यांदा हो बोलले, नंतर पुन्हा साहेब म्हणाले मला ते योग्य वाटत नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. कारण त्यांच्या नेतृत्वातच आम्ही सगळी पुढं गेलो. ‘पण हे सगळं होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही, कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. त्याच्यामुळे काही अडचण नव्हती . पण आता काय दोन पक्ष झाले आहेत. प्रत्येकाने कुठे ना कुठे थांबावं लागतं,” असे अजित पवार म्हणाले आहेत.