Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीचा खासदार भाजपचाच असणार; आमदार गोपीचंद पडळकरांचे विशाल पाटलांना थेट आव्हान

२०२९ च्या निवडणुकीसाठी आतापासूनच कंबर कसली असून, भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी आपण 'जीवाचे रान' करू आणि विरोधकांचा 'कार्यक्रम' करू, असा इशारा त्यांनी दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 07, 2026 | 07:50 AM
रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे 'नटरंग चित्रपटाच्या शूटिंगची एक्टिंग' -आ.गोपिचंद पडळकर

रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे 'नटरंग चित्रपटाच्या शूटिंगची एक्टिंग' -आ.गोपिचंद पडळकर

Follow Us
Follow Us:

सांगली : आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत सांगलीचा खासदार भारतीय जनता पक्षाचाच असेल, असा निर्धार भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. सांगलीत आयोजित भाजपच्या एका मेळाव्यात बोलताना पडळकरांनी विद्यमान खासदार विशाल पाटील यांना थेट आव्हान देत, “२०२९ मध्ये विशाल पाटील खासदार नसणार हे लिहून ठेवा,” असे विधान केले आहे.

पडळकर यांनी या मेळाव्यात बोलताना अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. २०२९ च्या निवडणुकीसाठी आतापासूनच कंबर कसली असून, भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी आपण ‘जीवाचे रान’ करू आणि विरोधकांचा ‘कार्यक्रम’ करू, असा इशारा त्यांनी दिला. विशाल पाटील यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले की, परिस्थिती काहीही असली तरी पुढील निवडणुकीत पाटील विजयी होणार नाहीत याची खात्री आपण पटवून देऊ.

पलूस-कडेगाव आणि इस्लामपूरमध्येही जोर लावणार

केवळ सांगली शहरच नव्हे, तर जिल्ह्यातील पलूस-कडेगाव आणि इस्लामपूर यांसारख्या भागांतही भाजप आता आक्रमकपणे काम करणार असल्याचे पडळकरांनी स्पष्ट केले. “भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आम्ही लोकांच्या मध्ये जाऊ, लोकांची कामे करू आणि मेहनत करून हा बदल घडवून आणू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पडळकरांकडून विरोधकांवर टीका

दरम्यान, या आव्हानामुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात आतापासूनच २०२९ च्या निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत विशाल पाटील, जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्यामुळे पडळकर यांच्या हातून जिल्हा परिषद अध्यक्ष पद गेल्याने आता ते या तीन नेत्यांचे उट्टे काढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

९९ टक्के कुणबी जातीचे दाखले बोगस

दुसरीकडे, आमदार पडळकर यांनी काही दिवसांपूर्वीच कुणबी दाखल्यावरून गंभीर आरोप केला होता. राज्यातील तब्बल ९९ टक्के कुणबी जातीचे दाखले बोगस असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपामुळे जोरदार खळबळ उडाली. आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटाचे सदस्य शिवराज (पृथ्वीराज) तानाजी पाटील यांच्या कुणबी दाखल्यावरून वाद पेटला असून, सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांतील विसंगतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

हेदेखील वाचा : Sangli News : ‘पीएम सूर्य घर’ योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा; खासदार विशाल पाटील यांचे महावितरणला निर्देश

Web Title: Sangli mp will definitely be from the bjp says mla gopichand padalkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 07:50 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Sangli Politics
  • Vishal Patil

संबंधित बातम्या

Vinod Tawade Special:  भाजपचे छुपे चाणक्य..! विनोद तावडे कसे बनले भाजपचे प्रमुख निवडणूक रणनीतीकार
1

Vinod Tawade Special: भाजपचे छुपे चाणक्य..! विनोद तावडे कसे बनले भाजपचे प्रमुख निवडणूक रणनीतीकार

Satara News : राहुल माने यांची भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड
2

Satara News : राहुल माने यांची भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
3

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.