जिल्हा परिषद निवडणुकीत बाबर गटाने चांगली कामगिरी करत अनेक जागा जिंकल्या. त्यामुळे सत्ता स्थापनेत बाबर यांची भूमिका निर्णायक मानली जात होती. मात्र, पडळकर यांच्याशी मतभेद असल्याने शिवसेना भाजप सोबत जाण्याची…
शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग (तात्या) इंगळे हे निवडीच्या वेळी अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर इंगळे यांच्या कथित अपहरणाची माहिती समोर आल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
भाजपची सत्ता उलथवून टाकत राष्ट्रवादीचे नेते अजितराव घोरपडे यांनी जोरदार राजकीय चाल खेळली. या घडामोडीमुळे भाजपला मोठा धक्का बसला असून जिल्ह्यातील सत्तासमीकरणेच बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या दहा अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, निवड प्रक्रियेचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.
महायुती व संदीप गिड्डे पाटील गट असे नव्या युतीचे नामकरण करण्यात आले आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही याच बॅनरखाली लढली जाणार असून, या युतीचे प्रवर्तक माजी मंत्री…
सांगली महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि विरोधक दोन्ही ३९ जागांवर अडकल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. विश्वजित कदम यांनी समविचारी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेचा दावा केला असून राजकीय हालचालींना वेग आला…
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर आजपासून अधिकृत प्रचाराला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाल्याचे चित्र आहे.
वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले, 'आमदार पडळकर यांची लायकी नसताना टीका करत आहे. मुख्यमंत्र्यांनी असल्याच्या गळ्यात पट्टा घालावा. राजकारणात असली नीच परिस्थिती आहे.
चंद्रहार पाटलांसाठी संजय राऊत यांन सांगतील शिवसेनेची प्रतिष्ठा धुळीस मिळवली. ज्या चंद्रहारसाठी संजय राऊत यांनी अट्टहास केला, त्याच चंद्रहारांनी आज पक्ष सोडला
लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट)कडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, याच मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटीलही इच्छुक होते.