Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali Municipal Election 2026: ‘जय-वीरू’ची जादू! विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांच्या एकजुटीने भाजपचा वारू रोखला

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर सन २०१८ मध्ये पहिल्यांदा भाजाचा झेंडा फडकला, मात्र यावेळी पहिल्यांदा कॉग्रेसला अवघड परिस्थिती होती

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 19, 2026 | 04:05 PM
Sangali Municipal Election 2026:

Sangali Municipal Election 2026:

Follow Us
Close
Follow Us:
  • सांगलीत विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांच्या एकजुटीने भाजपचा वारू रोखला
  • सांगली महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची तगडी झुंज
  • आघाडी आणि विधानसभेला भाजपा विरोधी मताची काठावरील बेरीज है काँग्रेस, राष्ट्रवादीचे बळ वाढवणारे गणित
Sangali Municipal Election 2026: अनेक नेते काँग्रेस सोडून गेलेले असताना सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापलिका निवडणुकीत सांगलीच्या ‘जय-विरू’ अर्थात खा. विशाल पाटील आणि आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या जोडीने गतवेळच्या निवडणुकी पेक्षा जास्त जागा मिळविण्यात यश आले. लोकसभा निवडणुकीवेळी दादा घराणे आणि कदम घरणे वाद मिटलेला असून आता आम्ही जय-विरूची जोडी असल्याचे या दोन नेत्यांनी जाहीर केले होते, तेच जय विरू आता महापालिका निवडणुकीत ताकदीने एकत्र लढले, शिवाय दादा घराणे आणि राजारामबापू घराणे असा वाद देखील मिटला असल्याचे सांगत आ. जयंत पाटील यांनी पहिल्यांदा नमती भूमिका घेऊन एकीने काँग्रेसला साथ दिली, याचे परिणाम म्हणून याना भाजपला पूर्ण बहुमता पासून रोखता आले.

अशी रोखले मत विभाजन

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतना महापालिका निवडणूक जाहीर होईपर्यंत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगले उमेदवार हाती लागतील का?, अशी चर्चा होती. या दोन्ही पक्षांनी नगरपालिका निवडणुकीत समन्वयाने काम करत एकीचा नव्या पॅटर्नची ‘लिटमस टेस्ट’ घेलली, ती यशस्वी झाल्यानंतर तोच प्रयोग महापालिकेत केला. आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम आणि ख. विशाल पाटील यांच्या एकजुटीने भाजपाविरोधात लढायचे बळ उभे केले. आघाडीला २१ जागा मिळाल्या, शिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत अघोषित तडजोड केली, त्यामुळे मतविभागणी टाळण्यात आलेले यश वामुळे भाजपचा चौफेर उधळलेला वारू सतेच्या उंबरठ्यावर रोखता आला.

Mayor reservation draw date : महापौर पदासाठी आरक्षण सोडत ‘या’ दिवशी होणार जाहीर; तारीख आली समोर

 

अडचण असून मिळवले यश

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर सन २०१८ मध्ये पहिल्यांदा भाजाचा झेंडा फडकला, मात्र यावेळी पहिल्यांदा कॉग्रेसला अवघड परिस्थिती होती, कारण काँगेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता, तर सांगली विधानसभा लढलेले काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता, माजी महापौर किशोर जामदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनोज सरगर सारखे तगडे नगरसेवकांनी देखील भाजपात प्रवेश केला. यामुळे कॉंगेसने निवडणूक लढायची कशी असा प्रश्न होता, मात्र तरही विशाल पाटील, विश्वजीत कदम यांनी जयंत पाटील यांच्या सोचतीने व्यूदरचना आखल्या, राष्ट्रवादी अजितपवार पक्षासोबत देखील समजोता केला. त्यांनी महापलिका क्षेत्रात तळ ठोकून तगडी लढत दिली.

काँग्रेस-राष्ट्रवादीला एकीनं तारलं; ६० टक्के स्ट्राईक रेट

लोकसभेला अपक्ष उभे राहिलेल्या विशाल पाटील यांना मिळालेली दणदणीत आघाडी आणि विधानसभेला भाजपा विरोधी मताची काठावरील बेरीज है काँग्रेस, राष्ट्रवादीचे बळ वाढवणारे गणित होते. फक्त विभागणी टाळण्याचे आव्हान होते. ते आधी जयंतरावांशी जुळवून घेत जमवले होते, त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हात पुढे केला आणि सर्वच नेत्यांनी दोन पावले मागे घेतली. तसेच ‘चाट लावली सांगलीची, गाठ आहे महाआघाडीशी’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून आघाडीने प्रचाराचे रान तापवले.

एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार; आजपासून उमेदवारी अर्ज वाटप

राष्ट्रवादीचे यश कमी पण !

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने २० जागांवर लढत्त दिली. त्यांनस तीन जागांवर यश मिळाले. यशाचा टक्का कमी असला तरी आघाडीच्या रचनेतील, प्रचारातील जयंत पपाटील यांचा सहभाग विरोधकांची खरी ताकद ठरला. जयंतरावांच्या भाषणांनी वातावरण तापवलं.

Web Title: Sangli municipal election 2026 the magic of jai veeru the unity of vishal patil and vishwajit kadam defeats the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Municipal Corporation Election
  • sangli news

संबंधित बातम्या

Sangli News : सांगलीत भाजपला सत्तेचा काटेरी मुकुट! काठावरच्या बहुमताने इकडे आड-तिकडे विहीर; बहुमताच्या जुळणीने झाले बेजार
1

Sangli News : सांगलीत भाजपला सत्तेचा काटेरी मुकुट! काठावरच्या बहुमताने इकडे आड-तिकडे विहीर; बहुमताच्या जुळणीने झाले बेजार

Sangli Politics: सांगली महापालिकेत सत्तेचा पेच! भाजपची डोकेदुखी वाढली; काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मोठा दावा
2

Sangli Politics: सांगली महापालिकेत सत्तेचा पेच! भाजपची डोकेदुखी वाढली; काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मोठा दावा

Sangli Municipal Election : सांगलीत दुपारनंतर मतदानाला प्रतिसाद; 4 वाजेपर्यंतची टक्केवारी वाचा सविस्तर
3

Sangli Municipal Election : सांगलीत दुपारनंतर मतदानाला प्रतिसाद; 4 वाजेपर्यंतची टक्केवारी वाचा सविस्तर

Exclusive: निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंचे राजकीय अस्तित्व संपेल का…? फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4

Exclusive: निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंचे राजकीय अस्तित्व संपेल का…? फडणवीसांचे रोखठोक उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.