Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगली जि.प.मध्ये खातेवाटपावरून वाद; काँग्रेस आक्रमक, ऐनवेळी खात्यांमध्ये मोठा बदल; अखेर लाड यांना शिक्षण-आरोग्य, तर…

सांगली जिल्हा परिषदेत खातेवाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत (अजित पवार गट) जुंपली. अखेर जयंत पाटलांच्या मध्यस्थीनंतर उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांना शिक्षण-आरोग्य खाते मिळाले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 17, 2026 | 08:51 PM
सांगली जि.प.मध्ये खातेवाटपावरून वाद; काँग्रेस आक्रमक

सांगली जि.प.मध्ये खातेवाटपावरून वाद; काँग्रेस आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

 

  • सांगली जि.प.मध्ये खातेवाटपावरून वाद
  • काँग्रेस आक्रमक, ऐनवेळी खात्यांमध्ये मोठा बदल
  • अखेर लाड यांना शिक्षण-आरोग्य, तर…
सांगली : जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष, दोन विषय समितीच्या खातेवाटपावरुन शुक्रवारी नाराजीनाट्य घडले. काँग्रेसकडे अकरा सदस्य असतानाही कमी दर्जाचे खाते दिले जात असल्याने आक्रमक भूमिका घेण्यात आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभापतींची समजूत काढल्याने नाराजीवर पडदा पडला. उपाध्यक्ष ऋषीकेश लाड यांना कृषी, पशुसंवर्धन खाते देण्यात येणार होते, मात्र काँग्रेसच्या नाराजीमुळे ऐनवेळी बदल करीत लाड यांना शिक्षण आणि आरोग्य खाते देण्यात आले. त्यामुळे अजितदादा राष्ट्रवादीच्या सावित्री रवि-पाटील यांच्याकडे कृषी आणि पशुसंवर्धन तर शिवसेनेचे पृथ्वीराज पाटील यांना बांधकाम, अर्थ खाते देण्यात देण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्षा संगिता पाटील यांनी विषय समिती सभापतींना प्रभार सोपविण्यात आला. दरम्यान उपाध्यक्ष आणि दोन विषय समित्यांच्या खाते वाटपावरुन खाते वाटपावरुन चांगलाच खल झाला. खातेवाटप आणि समिती सदस्यांच्या निवडीवरुन वाद मिटत नसल्याने दुपारी दोन वाजता आयोजित केलेली सभा सव्वातीन वाजता सुरु झाली. प्रारंभी सभेत नूतन पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी उपाध्यक्षांकडे कृषी आणि पशुसंवर्धन विभाग होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तोच फॉर्म्युला कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काँग्रेसकडे अकरा सदस्य असताना उपाध्यक्ष लाड यांना कमी दर्जाचे खाते मिळणार असल्याने काँग्रेस नेते आणि सदस्य आक्रमक झाले. परंतु काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे खात्यांमध्ये बदल करण्यात आला. अजितदादा गटाच्या सावित्री रवि-पाटील यांना शिक्षण आणि आरोग्य खाते देण्याचा निर्णय यापूर्वी नेत्यांनी घेतला होता. परंतु काँग्रेसच्या भूमिकेमुळे त्यांचे खाते बदलण्यात आले.

Sangli News: “विजेता कोण हे घोषणा नाही, जनता ठरवते!” गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्याला खासदार विशाल पाटील यांनी सुनावले

ऐनवेळी खाते बदल करण्यात येत असल्याने सावित्री तम्मनगौडा रवि-पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. परंतु आघाडीतील नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुपारी उशिराने बड्या नेत्यांच्या मध्यस्थीने रवि-पाटील यांची नाराजी दूर करण्यात यश आले. उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांना शिक्षण आणि आरोग्य विभागाचा पदभार सोपविण्यात आला. सभापती सावित्री रवि-पाटील यांच्याकडे कृषी आणि पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी तर सभापती पृथ्वीराज पाटील यांना बांधकाम खाते देण्यात आले. यावेळी समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर, महिला बालकल्याण सभापती स्नेहल मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त सीईओ मनोज जाधव, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह सदस्य आणि खातेप्रमुख उपस्थित होते.

जयंत पाटलांची मध्यस्थी

उपाध्यक्ष ऋषीकेश लाड आणि सभापती सावित्री तम्मनगौडा रवि-पाटील यांच्यातील खातेवाटपावरुन मतभेद झाले. सावित्री रवि-पाटील यांचे बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्या नाराज झाल्या. काही नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आ. जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर रवि-पाटील खाते बदलावर राजी झाल्या. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला पाठींबा देताना अजितदादा राष्ट्रवादीला दोन सभापती देण्याचा निर्णय झाला होता, त्यामध्ये शिक्षण-आरोग्य आणि महिला बालकल्याण समितीचा समावेश होता. मात्र खातेवाटपापूर्वी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याने खातेबदल झाले.

कृषी-पशुसंवर्धन खात्यांव्दारे शेतकर्‍यांना न्याय देवू: सावित्री रवि-पाटील

निवडणूकीच्या निकालानंतर आघाडीच्या नेत्यांनी शिक्षण आणि आरोग्य खाते देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता जयंत पाटील, डॉ विश्वजित कदम आणि अजित पवार गटाच्या सर्व नेत्यांच्या आग्रहाखातर इच्छा नसताना देखील जि. प. चा कारभार सुरळीत चालण्यासाठी आणि ग्रामिण भागातील शेतकर्‍यांसह सर्व घटकांना न्याय मिळावा म्हणून ही खाती घेतली. सव्वा वर्षानी शब्द दिलेली खाती देण्याचे अश्वासन सर्व नेत्यांनी दिले आहे. मिळालेल्या खात्यांना चांगल्या प्रकारे न्याय देवू, अशी प्रतिक्रिया सावित्री तम्मानगौडा रवि-पाटील यांनी दिली.

Sangli Politics: जयंत पाटील यांना मोठा दणका; सांगली बाजार समितीचे त्रिभाजन लागू

Web Title: Sangli zp portfolio allocation dispute congress ncp jayant patil mediation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • sangli news
  • Sangli Politics
  • sangli Zp

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.