Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्रकारांवर संतापले संजय दिना पाटील; ‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन’, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकी

शिंदे गटात प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी राजकीय प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकी दिल्याचा आरोप. ‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन’ असे वक्तव्य चर्चेत.

  • By विवेक
Updated On: Jun 25, 2026 | 02:34 PM
पत्रकारांवर संतापले संजय दिना पाटील; ‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन’, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकी

पत्रकारांवर संतापले संजय दिना पाटील; ‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन’, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकी

Follow Us
Follow Us:
  • संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना ‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन’ अशी धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप
  • याआधीही विरोधकांना हॉस्पिटल किंवा स्मशानात पाठवण्याच्या वक्तव्यामुळे मोठा वाद
  • संजय राऊतांची त्यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

उद्धव ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया विचारण्यासाठी आलेल्या पत्रकारांवर त्यांनी संताप व्यक्त करत धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप होत आहे.

आज (गुरुवार, 25 जुन) पत्रकारांनी त्यांना सध्या सुरु असलेल्या राजकीय वादांबाबत प्रश्न विचारले असता संजय दिना पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. “पुन्हा इथे आलात तर मारून पाठवेन,” अशा शब्दांत त्यांनी पत्रकारांना इशारा दिल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय म्हणाले संजय दिना पाटील ?

राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणार्या पत्रकारांवर संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केली. “तुम्ही परत इकडे आलात तर तुम्हाला मारून पाठवेन, हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय. तुम्हाला करायचंय ते करा,” अश्या भाषेत त्यांनी पत्रकारांवर अरेरावी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे माध्यम क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

MVA Meeting: ठाकरांचे ६ खासदार फुटल्याने खळबळ! महाविकास आघाडी कमालीची सावध; घेतली तातडीची मोठी बैठक

नेमकं काय घडलं ?

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीका करताना संजय दिना पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते. आपल्या विरोधात जाणाऱ्यांना हॉस्पिटल किंवा स्मशानात पाठवण्याची भाषा त्यांनी वापरल्याचा आरोप झाला होता. या वक्तव्यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्याच संदर्भात प्रतिक्रिया विचारण्यासाठी पत्रकार त्यांच्याकडे गेले असता हा नवा वाद निर्माण झाला. संजय दिना पाटील यांनी आपण केलेली विधाने लपूनछपून नसून उघडपणे केली असल्याचे सांगितले.

ते यावेळी म्हणाले, “मी जे बोलतोय ते खुलेआम बोलतोय. माझ्यावर काय कारवाई करायची असेल तर पोलीस करतील. मी कारवाई आणि चौकशीला तयार आहे.” यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर संताप व्यक्त करत ते म्हणाले, “तुम्ही माईक माझ्या तोंडासमोर का धरता? आता तुम्ही तिकडे जाऊन आलात ना? मग इकडे का येता? कशाला हे सगळं करताय?” असे म्हणत त्यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली. यामुळे त्यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

‘…हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला

Web Title: Sanjay dina patil threatens journalists after shiv sena entry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Sanjay Dina Patil
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
1

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप
2

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.