MVA Meeting (Photo Credit- x)
महाराष्ट्र विधिमंडळाच्या जून २०२६ पावसाळी अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे, मा. खा. संजयजी राऊत, मा. आ. सतेजजी पाटील, मा.… pic.twitter.com/PQXHOiY70R — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) June 24, 2026
या बैठकीत राज्यातील शेतकरी, युवक, महिला, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर अधिवेशनात आक्रमकपणे आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जनहिताच्या मुद्द्यांवरून महायुती सरकारला जाब विचारत लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी एकजुटीने लढणार असल्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे, मा. खा. संजयजी राऊत, मा. आ. सतेजजी पाटील, मा. भास्कररावजी जाधव तसेच महाविकास आघाडीचे सर्व आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार फुटल्याच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरे कमालीचे सक्रिय झाले असून ते थेट मैदानात उतरले आहेत. आजच्या बैठकीला स्वतः हजेरी लावल्यानंतर त्यांनी संघटनात्मक पातळीवर मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. माहितीनुसार, उद्धव ठाकरे लवकरच पक्षांतर केलेल्या त्या ६ खासदारांच्या मतदारसंघांचा झंझावाती दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून पक्षाची आणि महाविकास आघाडीची ताकद टिकवून ठेवण्यासाठी चाचपणी करणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत संघटनात्मक खिंडार पडू द्यायचे नाही, असा चंग ठाकरेंनी बांधल्याचे दिसत आहे.
‘…हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला






