Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Legislative Council MLA : अजित पवारांकडून विधान परिषदेचा उमेदवार जाहीर; अमरावतीच्या ‘या’ नेत्याला दिली संधी

विधान परिषदेच्या एका जागेसाठी अजित पवार यांच्याकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती. विधान परिषदेच्या एका जागेसाठी संजय खोडके यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 17, 2025 | 12:23 PM
अजित पवारांमुळे भाजपा खासदार झाले नाराज

अजित पवारांमुळे भाजपा खासदार झाले नाराज

Follow Us
Follow Us:

मुंबई : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागा झाल्या होत्या. यासाठी महायुतीकडून नावे जाहीर करण्यात येणार आहे. या पाच जागांसाठी भाजपच्या तीन, शिंदे गटाच्या एक आणि अजित पवार गटाला एक जागा देण्यात आली होती. अजित पवार यांच्याकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती. अनेक इच्छुकांनी कागदपत्रांची जुळवाजुळवी देखील करुन ठेवली होती. मात्र अजित पवार यांनी विधान परिषदेच्या एका जागेसाठी संजय खोडके यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. संजय खोडके हे अमरावतीचे नेते असून त्यांच्या पत्नी देखील राजकारणामध्ये असून आमदार आहेत.

विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस आहे. त्याआधी भाजपने आपल्या तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. अजित पवार यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे.  अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी, संजय दौंड,  उमेश पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू होती. दरम्यान,  विधान परिषदेच्या उमेदवारासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाची बैठक पार पडली. अजित पवार यांनी संजय खोडके यांना संधी दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संजय खोडके यांना विधान परिषदेच्या आमदारकीची संधी अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यांच्य पत्नी सुलभा खोडके या देखील अमरावती शहर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहे. 2017 मध्ये संजय खोडके हे विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात पराभूत झालेले असताना 2019 च्या निवडणुकीत सुलभा खोडके यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघाऐवजी अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. 2019 च्या निवडणुकीत सुलभा खोडके विजयी झाल्या.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे काँग्रेसने अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे. त्यानंतर, सुलभा खोडके यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते प्रवेश केला. 2024 मध्ये सुलभा खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर आता संजय खोडके यांना अजित पवार यांच्या पक्षाकडून विधानपरिषदेची संधी देण्यात आली आहे.

 रिक्त झालेल्या पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक

नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या.

 

Web Title: Sanjay khodke gets chance as mla of legislative council from ncp ajit pawar group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 12:10 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Nationalist Congress Party
  • political news

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?
2

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान
3

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही
4

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.