(फोटो सौजन्य - अकाउंट)
नाशिक : राज्यामध्ये कुणाल कामरा याच्या कवितेवरुन राजकारण तापलं आहे. कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कविता सादर केली. मात्र ही कविता सादर करताना त्याने विडंबनात्मक सादर केली. यामुळे शिंदे गट आक्रमक झाला. शिंदे गटाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा याचा स्टुडिओ फोडून टाकला. यामुळे कुणाल कामरा हा चर्चेमध्ये आला असून त्याला पोलिसांनी समन्स बजावला आहे. तर कुणाल कामरा याने माफी न मागण्याचा पवित्रा घेतला आहे. यानंतर या प्रकरणावरुन एकनाथ शिंदे यांना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा डिवचले आहे. त्यांनी शिंदेंवर टीका करुन कुणाल कामराची बाजू उचलून धरली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, कुणाला कामरा जेव्हा नवीन आला तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांसोबत देखील असे शो केले आहेत. मी त्यांच्या स्टुडिओत गेलो आहे ,माझ्यावर देखील असे अनेक जण टिपण्णी करतात. तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकला असता मग स्टुडिओ का तोडली यालाच औरंगजेबची वृत्ती म्हणलं जात, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिंदे गटाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा याच्या स्टुडिओची तोडफोड केली. यामध्ये स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. याची नुकसान भरपाई तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून करुन घेतली पाहिजे तसेच पोलीस आयुक्तांची बदली केली पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर आता संजय राऊत म्हणाले की, तोड्याचं असेल तर मंत्र्यांचे बंगले तोडा. मलबार हिल परिसरात असलेले मंत्र्यांचे अनेक बंगले अनधिकृत आहेत. रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणलं तर काय चुकीचे आहे? माझं आणि कामराचा DNA एकचं आहे,कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राज्यामध्ये रोज नवीन प्रकरणामुळे वातावरण तापत आहे. यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, तुमच्याच मंत्रिमंडळातील लोक कायदा सुव्यवस्थाला आवाहन देत आहेत हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतला पाहिजे. नुसतं छाछुगिरी करून उपयोग नाही, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
2014 च्या निवडणुकीच्या बोलणीमधील काही पत्ते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडले आहे. त्यांनी जागावाटपाची बोलणी पूर्ण झाली नसल्याचे सांगितले. यावर खासदार राऊत म्हणाले की, आता 2025 सुरु आहे. पुलाखालून खुप पाणी वाहून गेले आहे. 2019 ला काय झाले दिल्लीवरून आलेल्या नेत्यांची युती तोडण्याचे ठरले होते. शिवसेनेला संपवण्यासाठी वरिष्ठ नेते दिल्लीवरून आले होते. भाजपला आम्ही संपूर्ण राज्यात घेऊन गेलो. शिवसेना आपल्यासोबत असेल तरच देशात आणि राज्यात आपण सत्तेत येऊ शकतो असे भाजपाला त्यावेळी वाटले. म्हणून ते आमच्या जवळ आले शिवसेना जेव्हा संपूर्ण देशात निवडणूक लढवणार होती तेव्हा वाजपेयी यांचा फोन बाळासाहेब ठाकरे यांना आला. तुम्ही निवडणूक लढवली तर भाजपला नुकसान होईल आणि काँग्रेसला फायदा होईल असे वाजपेयी म्हणाले. 2014 ला देवेंद्र फडणवीस यांना युती तुटू नये असं प्रामाणिकपणे वाटत होतं, असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.