Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी पंतप्रधान असताना अमित शाह यांना एवढी घाई का?; खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

शिवसेनेतील खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अमित शाह आणि भाजपवर निशाणा साधला. मोदी पंतप्रधान असताना शाहांना पंतप्रधान होण्याची घाई का, असा सवाल त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Jun 21, 2026 | 06:32 PM
मोदी पंतप्रधान असताना अमित शाह यांना एवढी घाई का?; खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मोदी पंतप्रधान असताना अमित शाह यांना एवढी घाई का?; खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:

शिवसेना ठाकरे गट पक्षातील कथित खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देशभरात विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण सुरू असून त्यामागे अमित शाह यांची रणनीती असल्याचा आरोप करत, “नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना अमित शाहांना पंतप्रधान होण्याची एवढी घाई का लागली आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संजय राऊत यांनी देशभरात भाजपकडून विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला. “प्रचंड पैसा, ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून नेत्यांना आपल्या बाजूला वळवण्याचे काम सुरू आहे. ही संपूर्ण यंत्रणा अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

खासदारांबाबत अद्याप निर्णय जाहीर नाही

शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या चर्चांवर बोलताना राऊत म्हणाले की, संबंधित खासदारांनी अद्याप अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते अजूनही शिवसेनेचे सदस्य आहेत. “जर कुणाला वाटले असेल की आपण चुकीचा निर्णय घेतला किंवा भरकटलो, तर त्यांच्यासाठी ‘मातोश्री’चे दरवाजे आजही खुले आहेत. आम्ही कोणत्याही खासदाराचे नाव घेऊन टीका केलेली नाही. मात्र पक्षाचा व्हीप असताना बैठकीला अनुपस्थित राहणे आणि विरोधी हालचाली करणे योग्य नाही,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.

ओमराजेंना परत आणण्यासाठी हालचाली? संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

व्हीप जारी करण्यामागचे कारण स्पष्ट

खासदारांना व्हीप जारी करण्याच्या निर्णयाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, काही खासदार दिल्लीत राहून सत्ताधारी पक्षातील नेत्यांसोबत बैठका घेत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे पक्षविरोधी हालचाली रोखण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला. “पक्षाच्या भूमिकेविरोधात काम होत असल्याची माहिती मिळत होती. त्यामुळे संघटनात्मक शिस्त राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला,” असे त्यांनी सांगितले.

Nagesh Patil Asthikar: ‘शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, विचारधारा…’, नागेश पाटील आष्टीकरांनी फुटीमागचं खरं कारण केलं जाहीर

‘निधी हवा की स्वतःचा विकास?’

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या निधीबाबतच्या वक्तव्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “विकासकामांसाठी निधी मिळत नाही, अशी तक्रार आता केली जात आहे. पण निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या तिकिटावर निवडून येताना परिस्थिती माहीत नव्हती का?” असा सवाल त्यांनी केला. “उद्धव ठाकरे आणि पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली, जनतेने निवडून दिले. आता निधीच्या कारणावरून भूमिका बदलली जात असेल, तर निधी जनतेच्या विकासासाठी हवा की स्वतःच्या विकासासाठी, हा प्रश्न निर्माण होतो,” असा टोला त्यांनी लगावला.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग

शिवसेनेतील कथित खासदार फुटीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण तापले असून, आगामी काळात या प्रकरणावर आणखी मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यांमुळे ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Sanjay raut criticizes amit shah over mp split row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Amit Shah
  • PM Narendra Modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
1

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

‘2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील; सत्ताबदल त्यांच्या कारभारामुळेच..,’ पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
2

‘2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील; सत्ताबदल त्यांच्या कारभारामुळेच..,’ पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Dimagi Naxal Party Instagram Trend: पंतप्रधान मोदींच्या ‘दिमागी नक्षल’ विधानाचे सोशल मीडियावर बुमरँग; ‘दिमागी नक्षल पार्टी’ ट्रेंड
3

Dimagi Naxal Party Instagram Trend: पंतप्रधान मोदींच्या ‘दिमागी नक्षल’ विधानाचे सोशल मीडियावर बुमरँग; ‘दिमागी नक्षल पार्टी’ ट्रेंड

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण
4

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.