Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagesh Patil Asthikar: ‘शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, विचारधारा…’, नागेश पाटील आष्टीकरांनी फुटीमागचं खरं कारण केलं जाहीर

ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ बंडखोर खासदारांपैकी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पहिल्यांदाच फेसबुक लाईव्ह करत भूमिका स्पष्ट केली आहे. "मी शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, विकासकामांच्या निधीसाठी सत्तेत जाणे गरजेचे होते," असे आष्टीकर म्हणाले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 21, 2026 | 04:16 PM
नागेश पाटील आष्टीकरांनी फुटीमागचं खरं कारण केलं जाहीर (Photo Credit- X)

नागेश पाटील आष्टीकरांनी फुटीमागचं खरं कारण केलं जाहीर (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, विचारधारा…’
  • नागेश पाटील आष्टीकरांनी फुटीमागचं खरं कारण केलं जाहीर
  • जाणून घ्या काय म्हणाले…
मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत उद्धव ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या ६ लोकसभा खासदारांपैकी अखेर एका खासदाराने जाहीरपणे समोर येत आपली भूमिका मांडली आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Asthikar) यांनी थेट फेसबुक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय

“मी दुसरीकडे कुठेही गेलो नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय! मी बाळासाहेबांची विचारधारा सोडलेली नाही,” असे स्पष्ट करत आष्टीकरांनी आपण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतपणे सामील झाल्याचे जाहीर केले. मतदारसंघात रखडलेली विकासकामे आणि निधीची चणचण यामुळेच आपण सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी परखडपणे कबूल केले आहे.

मेळाव्यातील बोचऱ्या टीकांमुळे मन दुखावले…

बंडखोरीचे मुख्य कारण स्पष्ट करताना नागेश पाटील आष्टीकर भावुक झाले. ते म्हणाले, “आम्ही सर्व ६ खासदार १८ जून २०२६ पर्यंत कुठेही गेलो नव्हतो. मात्र, त्या दिवशी मेळाव्यात ज्या पद्धतीने आमच्यावर अविश्वास दाखवला गेला, भाषेचा अतिरेक झाला आणि बोचऱ्या शब्दांत टीका करण्यात आली, त्याने आमची मने दुखावली. तिथल्या वागणुकीमुळेच आता ‘उबाठा’ सेनेत थांबून काही उपयोग नाही, असा विचार सर्व सहकाऱ्यांनी केला.”

ओमराजेंना परत आणण्यासाठी हालचाली? संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी जीवापाड जपेन

मतदारसंघातील जनतेशी नाळ जोडताना आष्टीकर म्हणाले, “लोकांनी मला खूप मोठ्या अपेक्षेने आणि विश्वासाने खासदार म्हणून निवडून दिले आहे. प्रत्येक गावात गेलं की नागरिक हक्काने विकासकामांची मागणी करतात. पण विरोधी पक्षात राहून पंचायत समित्या, नगरपालिका किंवा इतर कामांसाठी निधी कुठून आणायचा? सत्तेशिवाय कोणतीही कामे होत नाहीत, हेच विदारक सत्य आहे. मी जे पाऊल उचलले आहे, ते केवळ हिंगोलीच्या विकासासाठी आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे, मतदारांनी मला ‘सालानं’ ठेवलं आहे, मी तुमचं साल प्रामाणिकपणे आणि नेकीनं करेन. माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी जीवापाड जपेन.”

“आपल्याच गावच्या बाभळी आणि आपल्याच गावच्या बोरी…”

सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. “अनेकांना माझी भूमिका पटली नसेल, काहींना पटली असेल. मात्र, माझ्यावर रागावलेल्या कार्यकर्त्यांना मी माझ्या कामातून उत्तर देईन. कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, राग व्यक्त करा पण असंवैधानिक किंवा गलिच्छ भाषा वापरू नका. कारण, ‘आपल्याच गावच्या बाभळी आणि आपल्याच गावच्या बोरी’ असतात, आपल्याला एकत्रच राहायचे आहे. संजय राऊत किंवा इतर कोणी माझ्यावर टीका करत असतील, तर त्यांचा माझ्यावर हक्क आहे, त्यामुळे मला वाईट वाटणार नाही,” असे आष्टीकर म्हणाले.

Omraje Nimbalkar: ‘फक्त चर्चेने मी वाईट झालो?’; रीलस्टार टिकेवर ओमराजे निंबाळकर भावुक, ‘ऑपरेशन टायगर’ फेल होणार?

Web Title: Nagesh patil ashtikar has revealed the real reason behind the split

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • sanjay raut
  • shivsena
  • UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
2

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
3

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?
4

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.