Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Criticized BJP: प्राथमिक शाळेत कांदा, बटाटा, लसूण खाण्यास बंदी! संजय राऊतांचा शाळा व्यवस्थापनाला इशारा

Sanjay Raut Criticized BJP: संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत संजय राऊत म्हणाले, 'कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी' असा तुकाराम महाराजांचा अभंग असताना कुणी काय खावं हे तुम्ही कोण ठरवणार? हे महाराष्ट्रात चालणार ना

  • By anuradha sagar
Updated On: Sep 10, 2026 | 02:31 PM
Sanjay Raut, Devendra Fadnavis, Maharashtra Politics

Sanjay Raut, Devendra Fadnavis, Maharashtra Politics

Follow Us
Follow Us:
  • मीरा-भाईंदरमधील ‘सेव्हन स्क्वेअर अकॅडमी’ शाळेत पर्युषण काळात कंदमुळांच्या भाज्यांवर बंदी
  • खासदार संजय राऊत आक्रमक; शाळेला तातडीने टाळे ठोकण्याची प्रशासनाकडे मागणी
  • प्राथमिक शाळेत धर्म आणणे लव्ह जिहादपेक्षा भयंकर, राऊतांची आक्रमक टीका
School Onion Potato Ban Controversy:  सेव्हन स्क्वेअर अकॅडमी’ या शाळेला तातडीने टाळे लावले पाहिजे. ज्या शाळा अशी मनमानी करत आहेत त्या शाळा तातडीने बंद केल्या पाहिजे. धर्म तुमच्या घरात शाळेपर्यंत धर्म येता कामा नये. विशेषतः प्राथमिक शाळेपर्यंत कोणी धर्म आणत असाल तर, तुम्ही शाळेचे जे कोणी चालक-मालक असतील, त्यांनी घरी बसावं, महाराष्ट्रात अशी बंधने लादली जात असतील तर, धर्माच्या नावावर हे लव जिहाद पेक्षा भयंकर आहे,” अशी टिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मीरा भाईंदर येथील ‘सेव्हन स्क्वेअर अकॅडमी’ या शाळा व्यवस्थापनाने पर्युषण काळात विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, बटाटा, लसूण, बीट आदी कंदमुळांच्या भाज्या आणण्यावर बंदी घातली आहे. यावरून संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “विद्यार्थ्यांवर असे निर्बंध लादणारे तुम्ही कोण, हे कशाकरता करत आहात. हे कठीण आहे. हे म्हणजे महाराष्ट्राला दिलेलं आव्हान आहे. महाराष्ट्राने काय खायचं काय नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?” असा सवालही संजय राऊतांनी केला आहे.

Pune Metro Line 3: हिंजवडीकरांची प्रतीक्षा संपणार! पुणे मेट्रो लाईन ३ ची तारीख लवकरच जाहीर होणार

संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत संजय राऊत म्हणाले, ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ असा तुकाराम महाराजांचा अभंग असताना कुणी काय खावं हे तुम्ही कोण ठरवणार? हे महाराष्ट्रात चालणार नाही. अशा प्रकारच्या शाळा देवेंद्र फडणवीस चालू देतात आणि तो चालवणारा त्यांच्या पक्षातला आमदार आहे, हे दादागिरी आहे तुम्ही काय करत आहात, हे आमच्या महाराष्ट्राचे खाद्य आहे आणि तुम्ही आमच्या खाण्यावरती बंधने लादता. शाळेत आणायचं नाही हे ठरवणारे तुम्ही कोण, तुम्ही पॉलिसी ठरवत आहात का या राज्याची, देवेंद्र फडणवीसजी तुमच्या राज्यात जे चालू आहे ते बरोबर नाही,” असंही संजय राऊत यांनी नमुद केलं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लंडनमध्ये मिळणाऱ्या पुरस्काराबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “अशा पुरस्कारांशी मला माहिती नसते मी भारतीय माणूस आहे पण हाच पुरस्कार काही काळापूर्वी गोव्याचे विजय सरदेसाई यांना दिला होता. भारतासह संसद रत्न पुरस्कार ठिकठिकाणी दिला जातो. ते कधी तोंड उघडत नाही. तो काही सरकारी पुरस्कार नसतो खाजगी संस्था असतात. त्याच्यामुळे या देशांमध्ये हजारो संसद रत्न आहेत त्यांनी कधी तोंड उघडलं नाही. मलाही दोनदा दिला मी स्वीकारला. त्यात पद्धतीने एखाद्या संस्थेने भारतीय नागरिकाला पुरस्कार दिला असेल तर टिका का करायची. लंडन हा विरंगुळा आहे, ते तिकडे हवापालट करायला गेले असतील. सध्या दरे गावातील हवा गरम आहे ऊन फार आहे ” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Legal Notice To Vidyanand Bapat: ४८ तासांत बिनशर्त माफी मागा…; विद्यानंद बापटांना कोणी पाठवली कायदेशीर नोटीस?

पार्थ पवार यांच्या भूमिकेवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, “विरोधी पक्ष बऱ्याच गोष्टी विसरतो महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला विसरायची आजार झाला आहे. जसा की काल अजित दादा पवार यांच्या अपघातावरून आमच्या सुप्रिया सुळे म्हटल्या यापुढे तो विषय काढणार नाही, का नाही काढायचा अजित पवार हे काही प्रायव्हेट प्रॉपर्टी नव्हते, कोणाचे वडील असतील कोणाचे पती असतील, पण तेराज्याचे उपमुख्यमंत्री आणि लोकनेते होते मोठे नेते होते, राज्याचे पाच ते सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेला माणूस मोठा नेता संशयास्पद त्याचा मृत्यू होतो, हा कोणाचाही खाजगी आणि कौटुंबिक प्रश्न असू शकत नाही. महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांवर आम्ही प्रश्न विचारतो. जेव्हा तुम्ही समाजकारणामध्ये असता राजकारणात असता, तेव्हा त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या बाबतीत संशयास्पद काही असेल तर त्या संदर्भात विरोधी पक्षाला आणि नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. हा विषय बंद करून चालणार नाही. असंही त्यांनी सांगितलं.

Web Title: Sanjay raut demands action against seven square academy mira bhayandar over food restrictions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Maharashtra Gram Panchayat News: राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज! विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती
2

Maharashtra Gram Panchayat News: राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज! विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी
3

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.