Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा

शिर्डीतील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात संजय राऊत यांनी बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'साईबाबांची तीनदा शपथ घेतली आणि 100 कोटींना विकले गेले' असा आरोप करत त्यांनी शिवसैनिकांना बंडखोरांविरोधात लढण्याचे आवाहन केले.

  • By विवेक
Updated On: Jun 29, 2026 | 02:31 PM
'शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश'; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा

'शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश'; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा

Follow Us
Follow Us:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डी येथे आयोजित जाहीर सभेत भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. बंडखोर खासदार  भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघातील या सभेत बोलताना त्यांनी जोरदार निशाणा साधला. यावेळी खासदार संजय राऊत यांनीही वाकचौरेंचा चांगलाच समाचार घेतला.

शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या या सहा खासदारांच्या मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे हे मेळावे घेत असून स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज (सोमवार, 29 जून) शिर्डी येथे आयोजित सभेत संजय राऊत यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर कडाडून टीका केली. तसेच, 100 कोटी रुपयांना विकले गेल्याचे आरोपही त्यांनी केले.

‘रस्त्यात दिसला तर ऑपरेशन तुडवा करा’ कार्यकर्त्यांना आक्रमक आवाहन

मेळाव्यात बोलताना संजय राऊत म्हणाले की, “या गद्दार खासदाराचे काही करू नका, पण रस्त्यात दिसला तर ‘ऑपरेशन तुडवा’ करा.” तसेच शिर्डीतील एका मुस्लिम समर्थकाने शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचा फलक लावल्याचा उल्लेख करत, ही भावना संपूर्ण महाराष्ट्राची असल्याचे त्यांनी सांगितले.

मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? उद्धव ठाकरेंचा मोठा दावा; लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी

‘साईबाबांची तीनदा शपथ घेतली आणि 100 कोटींना विकला गेला’

भाऊसाहेब वाकचौरे यांनी दुसऱ्यांदा बंडखोरी केल्याचा आरोप करत राऊत म्हणाले, “हा शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश आहे. याने एकदा गद्दारी केली, नंतर माफी मागून परत आला आणि खासदार झाला. पण आता पुन्हा 100 कोटींना विकला गेला.” राऊत यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरे यांनी वाकचौरेंना पक्षांतराच्या चर्चेबाबत विचारणा केली असता त्यांनी तीन वेळा साईबाबांची शपथ घेत पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले होते.

‘एक रुपयाही खर्च न करता खासदार झाला’

संजय राऊत यांनी दावा केला की, भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवडणुकीसाठी पक्षाने सर्व खर्च केला आणि शिवसैनिकांनी जीवाचे रान करून प्रचार केला. मात्र त्यानंतर त्यांनी पक्ष सोडल्याची टीका राऊत यांनी केली.

धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप

‘उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रात तुफान’

उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर सुरू असलेल्या दौऱ्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे फिरायला लागले की महाराष्ट्रात राजकीय तुफान येते. हे गद्दार त्या तुफानात वाहून जातील.” त्यांनी पुढे वाकचौरेंना उद्देशून, “आता तुला पुन्हा लोकसभेचे तोंड पाहायला मिळणार नाही,” अशी टीकाही केली.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र आता यामुळे राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले असून शिवसेना शिंदे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Sanjay raut on bhausaheb wakchaure shirdi mp criticism 100 crore allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • sanjay raut

संबंधित बातम्या

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
1

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
2

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.