Sanjay Raut said that Tawwuhar Hussain Rana will not be hanged till Bihar elections
मुंबई : मुंबईसह देशभराला हदवणारा 26/11 दहशदवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता. यामध्ये मुंबईच्या रस्त्यावर भीषण शांतता आणि विधंवत्सक पहायला मिळाला होता. या प्रकरणामध्ये तहव्वुर राणा हा मास्टरमाईंड म्हणून आरोपी आहे. मुंबईमध्ये दहशदवादी हल्ला करण्यामध्ये रेकी करणारा तहव्वुर राणा याच्या मुसक्या आवळून त्याला भारतामध्ये आणण्यात आले आहे. तहव्वुर राणाला भारतात येताच मिळाली 18 दिवसांची कोठडी देण्यात आली असून NIA मुख्यालयात आणले जाणार आहे. मात्र आता तहव्वुर राणा याला बिहारच्या निवडणूका होईपर्यंत फाशी दिली जाणार नाही असा गंभीर दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच तहव्वुर राणा याच्या फाशीबाबत देखील मोठे विधान केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर हुसेन राणा याला तात्काळ फाशी देण्यात यावी आणि बिहार निवडणुकीदरम्यान सरकार असे करेल असा दावा त्यांनी केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “कुलभूषण जाधव यांना मायदेशी परत आणावे, जाधव यांना 2016 मध्ये अटक करण्यात आली होती आणि हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. भारताने पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले आहेत आणि ते बनावट असल्याचे म्हटले आहे. नवी दिल्लीच्या म्हणण्यानुसार, जाधव यांचे इराणमध्ये अपहरण करण्यात आले होते, जिथे त्यांचे कायदेशीर व्यावसायिक हितसंबंध होते आणि त्यांना पाकिस्तानात आणण्यात आले. जाधव यांना वाचवण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली, ज्याने पाकिस्तानला त्यांच्या फाशीला स्थगिती देण्याचे आदेश दिले.”
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, तहव्वुर राणा याला ताबडतोब फाशी देण्यात यावी, पण त्यांना बिहार निवडणुकीदरम्यान (या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या) फाशी देण्यात येईल. राणाला भारतात आणण्याची लढाई गेल्या 16 वर्षांपासून सुरू आहे आणि ती काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाली. म्हणून राणाला भारतात परत आणण्याचे श्रेय कोणीही घेऊ नये, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. राणाला भारतात आणणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटनीतीचे यश आहे असे मत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले की, “राणा हा भारतात प्रत्यार्पण केलेला पहिला आरोपी नाही. याआधी 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमलाही भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. आर्थिकदृष्ट्या फरार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना भारतात प्रत्यार्पण करण्याची मागणीही खासदार संजय राऊत यांनी केली आहे.