गरीब कुटुंबाना मिळणार 2 लाख रुपये; नितीश कुमारांची घोषणा, नक्की काय आहे योजना?
पाटणा : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात आता बिहार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवृत्तीबाबत विधान केले. अश्विनी चौबे यांच्या विधानानंतर लगेचच, जदयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी वक्तव्य केले. ‘गृहमंत्री अमित शहा यांनी २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील’ असे म्हटल्याचे सांगितले.
माजी केंद्रीयमंत्री अश्विनी चौबे म्हणाले की, ‘नितीशकुमार देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत खांद्याला खांदा लावून चालत आहेत. जर त्यांना उपपंतप्रधानाचा दर्जा दिला तर बिहारला आशीर्वाद मिळेल. यामुळे आपल्याला जगजीवन राम यांच्यानंतर दुसरे उपपंतप्रधान मिळतील. ही आमची वैयक्तिक इच्छा आहे. अश्विनी चौबे यांच्या विधानानंतर लगेचच, जदयूचे विधान परिषद सदस्य नीरज कुमार म्हणाले की, ‘कोणी जे बोलते ते वैयक्तिक संदर्भ नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी जाहीरपणे सांगितले की, २०२५ च्या निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील’.
लोकसभा निवडणुकीत आम्ही 30 जागांवर विजयाचा झेंडा फडकवला. आम्हाला १७४ पेक्षा जास्त विधानसभा जागांवर आघाडी आहे. नितीश कुमार हे बिहारसाठी आशा आहेत, ज्यांच्यावर लोजपा, भाजपा, आरएलएसपीच्या केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास आहे.
काही नेत्यांना नोटीस
विकासशील इंसान पार्टीचे संरक्षक मुकेश साहनी, राष्ट्रीय अध्यक्ष संतोष साहनी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे. त्यांना 6 मे रोजी न्यायालयात प्रत्यक्ष किंवा त्यांच्या वकिलामार्फत हजर राहून त्यांची बाजू मांडावी लागेल. हजर न झाल्यास, न्यायालय एकतर्फी सुनावणी करेल आणि आदेश देईल.