Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही’; मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा, ‘काही लोक त्यांना बळजबरीने…’

नीट आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या अभिजीत दिपकेबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. दिपकेला काही लोक बळजबरीने राजकारणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Jul 27, 2026 | 07:36 PM
'राजकारण हा अभिजीत दिपकेच्या विषय नाही'; मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा

'राजकारण हा अभिजीत दिपकेच्या विषय नाही'; मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा

Follow Us
Follow Us:
  • अभिजीत दिपकेच्या घरी जाऊन कुटुंबीयांची घेतली भेट.
  • दिपकेला राजकारणात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा.
  • आंदोलनानंतरच भेट दिल्याचे शिरसाटांचे स्पष्टीकरण
 

नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या अभिजीत दिपके यांच्याबाबत राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. अभिजीत दिपके यांना काही जण राजकारणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, राजकारण हा दिपके किंवा त्यांच्या कुटुंबाचा विषय नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, दिपके कुटुंबाशी त्यांचे अनेक वर्षांचे कौटुंबिक संबंध आहेत. “अभिजीतला मी लहानपणापासून ओळखतो. माझा मुलगा त्यांच्या बहिणीकडून राखी बांधून घेतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची भेट घेणे हे नैसर्गिक होते,” असे त्यांनी नमूद केले.

शिरसाट यांनी स्पष्ट केले की, आंदोलन सुरू असताना त्यांनी दिपके यांच्या घरी भेट दिली असती, तर त्याचा चुकीचा राजकीय अर्थ काढला गेला असता. त्यामुळे आंदोलन संपल्यानंतरच त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही कॉकरोच जनता पार्टीचा आंदोलनाचा इशारा! ‘गुन्हे मागे घ्या, अन्यथा पुन्हा…’

अभिजीत दिपके यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांची भेट घेतल्यानंतर त्यांना विरोधी पक्षांकडून राजकारणात येण्याची ऑफर मिळाल्याच्या चर्चांवरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते, अभिजीत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी भावनिक भूमिकेतून आंदोलन केले. मात्र, त्यांच्या आई-वडिलांची इच्छा मुलाने नोकरी करून स्थिर आयुष्य जगावे, अशी असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकारणात प्रवेश करायचा की नाही, हा पूर्णपणे अभिजीत दिपके यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगतानाच, काही लोक त्यांना बळजबरीने राजकारणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. तसेच दिपके यांच्या नावाचा वापर करून काही जण राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही दावा त्यांनी केला.

Dharmendra Pradhan: ‘मी रस्त्यावरचा लढवय्या आहे, एसी रूममध्ये बसून…’, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

दिल्लीतील आंदोलनानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याचा उल्लेख करत, त्या घडामोडींवरही शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे अभिजीत दिपके यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

Web Title: Sanjay shirsat on abhijit dipke politics statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • CJP Protest
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Laxman Hake : ‘अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,’ जरांगेंना पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाकेंचा संताप
1

Laxman Hake : ‘अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,’ जरांगेंना पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाकेंचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.