Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sayaji Shinde meets Raj Thackeray : नाशिकच्या तपोवनासाठी सयाजी शिंदेंनी गाठली मुंबई; मनसे नेते राज ठाकरेंची घेतली भेट

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये वृक्षतोड केली जात आहे. याविरोधात आवाज उठवणाऱ्या सयाजी शिंदे यांनी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली असून वृक्षतोडीचा मुद्दा मांडला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 08, 2025 | 12:43 PM
Sayaji Shinde meets MNS leader Raj Thackeray regarding the felling of Tapovan trees in Nashik

Sayaji Shinde meets MNS leader Raj Thackeray regarding the felling of Tapovan trees in Nashik

Follow Us
Close
Follow Us:
  • सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधूग्रामसाठी झाडांची कत्तल
  • नाशिकच्या वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे आक्रमक
  • सयाजी शिंदे आणि मनसे नेते राज ठाकरे यांची भेट
Nashik Tapovan tree felling : नाशिक : राज्यामध्ये पर्यावरण प्रेमी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये (Nashik News) यंदा सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे. दरम्यान, तपोवनासाठी प्रशासनाकडून झाडांची कत्तल करण्याचे ठरवण्यात आले. यावरुन पर्यावरण प्रेमी आणि अभिनेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला. नाशिकची ही झाडे वाचवण्यासाठी आता सजायी शिंदे यांनी मुंबई गाठली. अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली.

राज्य सरकारकडून साधूग्राम उभारण्यासाठी हजारो झाडे कापली जाणार आहेत. भलीमोठी ही झाडे कापल्याने जैवविविधता, प्राणी आणि पक्षांचे मोठे नुकसान होणार आहे. याविरोधात सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. सयाजी शिंदे यांनी सरकारवर टीका करत मोठे जनआंदोलन उभे केले. याच पार्श्वभूमीवर आता सयाजी शिंदे हे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. सयाजी शिंदे हे सोमवारी (दि. 08) सकाळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी आले.

हे देखील वाचा : विरोधकांना उरला नाही आवाज? इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही

नाशिकमध्ये मनसेनेही वृक्षतोडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आणि सयाजी शिंदे एकत्र येऊन तपोवनातील लढा आणखी तीव्र करणार असल्याचे चित्र आहे. सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या वृक्षतोडीविरोधात आवाज उठवला. मनसे नेते राज ठाकरे यांच्या साथीमुळे सयाजी शिंदे यांच्या आंदोलनाला बळकटी येणार आहे.

नाशिकमधील “तपोवन वाचवा” मोहिमेला वेग मिळला असून आज प्रसिद्ध अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांनी मा. राजसाहेब ठाकरे यांची विशेष भेट घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष श्री. अमेय खोपकर देखील यावेळी उपस्थित होते.
बैठकीत तपोवनचे जतन, परिसरातील जैवविविधतेचे रक्षण आणि… pic.twitter.com/0diLpHEnjk
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 8, 2025

हे देखील वाचा : विरोधकांचा चहापानवर बहिष्कार! विजय वडेट्टीवारांनी थेट वाचली रखडलेल्या प्रकल्पांची यादी

नाशिकच्या वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे म्हणाले की, राजकारणाबदल माझा अभ्यास नाही, पण झाडाबद्दल राजकारण करू नका. अजितदादांनी पाठिंबा दिला तसा भाजपच्याही काही लोकांनी पाठिंबा दिला आहे. 50 फूटी झाडं तोडायची आणि त्या बदल्यात नवी झाडं लावायची.. एवढी मोठी पळवाट शोधू नका. चुकीचा निर्णय होता कामा नये. सगळी झाडे जगली पाहिजेत. झाडांचा आधी विचार नंतर माणसांचा विचार केला पाहिजे. साधू आले-गेले काही फरक पडत नाही, पण झाडं गेली तर फरक पडतो, अशी आक्रमक भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतली आहे.

 

Web Title: Sayaji shinde meets mns leader raj thackeray regarding the felling of tapovan trees in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • Nashik News
  • raj thackeray
  • Sayaji Shinde

संबंधित बातम्या

राजकीय घडामोडींना वेग! KDMC शिंदे सेना अन् मनसेच्या युतीने ठाकरेसेना नाराज, संजय राऊत शिवतीर्थावर दाखल
1

राजकीय घडामोडींना वेग! KDMC शिंदे सेना अन् मनसेच्या युतीने ठाकरेसेना नाराज, संजय राऊत शिवतीर्थावर दाखल

मोठी बातमी ! इलेक्शन ड्युटीला दांडी पडणार महागात; तब्बल 200 जणांची नोकरी संकटात
2

मोठी बातमी ! इलेक्शन ड्युटीला दांडी पडणार महागात; तब्बल 200 जणांची नोकरी संकटात

मराठी माणसांनी का दिली ठाकरे बंधूंच्या हाकेला साद? BMC निवडणुकीत उद्धव-राज कुठे पडले कमी
3

मराठी माणसांनी का दिली ठाकरे बंधूंच्या हाकेला साद? BMC निवडणुकीत उद्धव-राज कुठे पडले कमी

Raj Thackeray BMC Election 2026: ‘ही निवडणूक सोपी नव्हती..’;  निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंच्या फेसबुक पोस्टची चर्चा
4

Raj Thackeray BMC Election 2026: ‘ही निवडणूक सोपी नव्हती..’; निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंच्या फेसबुक पोस्टची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.