Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले

फिर्यादीला मालमत्ता जप्त करण्याची आणि तात्काळ अटक करण्याची भीती दाखवून आरोपींनी त्यांच्याकडील पैशांची चौकशी करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ७१ लाख रुपयांची रक्कम भरण्यास भाग पाडले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 21, 2026 | 01:46 PM
डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले

डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले

Follow Us
Follow Us:
  • डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना
  • सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • सायबर भामट्यांचा बनाव आणि फसवणूक
नाशिक : दहशतवादी कृत्यांची भीती घालून आणि मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन एका नागरिकाची तब्बल ७१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. २८ सप्टेंबर २०२६ ते १७ऑक्टोबर २०२६ या कालावधीत फिर्यादी आपल्या राहत्या घरी असताना मोबाईल फोन व इंटरनेटच्या माध्यमातून हा प्रकार घडला.

आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधून ‘काश्मीर केस जेके ९५२७’ मधील दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्याकडे फिर्यादीचे आधारकार्ड मिळून आले असून, त्याद्वारे फिर्यादीचे एचडीएफसी बँकेत खाते उघडून ७० कोटी रुपयांची मनी लॉड्रिंग केल्याचा बनाव रचण्यात आला.

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यात मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधणारी सीमा रॉय (व्हॉट्सअॅप क्र. ९१ ७९०२०८४५१७ व ९१ ९३७१४२९८०७), तसेच विक्रम सिंग व राकेश अग्रवाल या नावांचा समावेश आहे. याशिवाय, सिग्नल अॅपद्वारे संपर्क साधणारे अनोळखी इसम आणि फसवणुकीची रक्कम वळती करण्यासाठी वापरण्यात आलेल्या तीन खासगी बँकांच्या खातेधारकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे करत आहेत.

बँक खात्यांवर रक्कम भरण्यास भाग पाडले

फिर्यादीला मालमत्ता जप्त करण्याची आणि तात्काळ अटक करण्याची भीती दाखवून आरोपींनी त्यांच्याकडील पैशांची चौकशी करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ७१ लाख रुपयांची रक्कम भरण्यास भाग पाडले. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

सायबर भामट्यांचा बनाव आणि फसवणूक

धमकीचा विषय : काश्मीर प्रकरणातील दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे भासवून ७० कोटींच्या मनी लॉड्रिंगचा खोटा आरोप. फसवणुकीची रक्कमः एकूण ७१ लाख रुपये विविध खात्यांवर जमा करून घेतले.

वापरलेली खाती : अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि कॅनरा बँक. संशयित नावेः सीमा रॉय, विक्रम सिंग आणि राकेश अग्रवाल.

Web Title: Rs 71 lakh extorted under threat of implicating in money laundering case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • crime news
  • Digital Arrest
  • Nashik News

संबंधित बातम्या

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद
1

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद

महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच…
2

महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच…

संतापजनक! शिरूरच्या कारेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात नेले अन्…
3

संतापजनक! शिरूरच्या कारेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात नेले अन्…

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?
4

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.