Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवार आज नाशिकमध्ये; सुप्रिया सुळेंसह रोहित पवारही येणार, आगामी निवडणुकांबाबत…

एकदिवसीय शिबिरासाठी शरद पवार यांचे रात्री उशीरा नाशिकमध्ये आगमन झाले असून, सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 14, 2025 | 09:11 AM
शरद पवार आज नाशिकमध्ये; सुप्रिया सुळेंसह रोहित पवारही येणार, आगामी निवडणुकांबाबत...

शरद पवार आज नाशिकमध्ये; सुप्रिया सुळेंसह रोहित पवारही येणार, आगामी निवडणुकांबाबत...

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय शिबिर रविवारी (दि. १४) नाशिक येथे होत आहे. या एक दिवसीय शिबिराला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार असून, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

एकदिवसीय शिबिरासाठी शरद पवार यांचे रात्री उशीरा नाशिकमध्ये आगमन झाले असून, सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शरद पवार गटाच्या या शिबीराकडे पाहिले जात आहे. या शिबिरात राजकीय स्थितीबरोबरच सरकारच्या कामगिरीची चिरफाड होणार आहे. त्यासाठी विविध विषयांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.

तसेच याच शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणकीसाठी पक्षाची भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी दहा वाजता पंचवटीतील स्वामी नारायण मंदिराच्या सभागृहात या शिबीराचे उ‌द्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येईल व समारोपाला ते मार्गदर्शन करतील.

सोमवारच्या मोर्चात सहभागी होणार

शहरात आगमन या शिबीरासाठी उपस्थित राहण्यासाठी शरद पवार यांचे शनिवारी रात्री उशीरा झाले. तत्पूर्वी सायंकाळी सहा वाजता दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी या कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जन्मगावी उभारण्यात आलेल्या स्मारकाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पहिलाच मोर्चा

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यातील पहिलाच मोर्चा पक्षाच्यावतीने नाशिकमध्ये काढण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी बारा वाजता गोल्फ कल्ब मैदानापासून या मोर्चाला सुरूवात होईल, त्यात पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. मोर्च जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर शरद पवार मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करतील अशी माहिती आता देण्यात आली.

Web Title: Sharad pawar in nashik today rohit pawar will also come along with supriya sule for party meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 09:11 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nationalist Congress Party
  • political news
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Pune News: म्हाळुंगे येथे राष्ट्रवादीला उस्फूर्त प्रतिसाद; पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग
1

Pune News: म्हाळुंगे येथे राष्ट्रवादीला उस्फूर्त प्रतिसाद; पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा
2

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा

Maharashtra Politics: कॉँग्रेसचा ‘हात’ मोडला? भाजपने केला गेम; थेट 12 नगसेवक फोडले अन्…
3

Maharashtra Politics: कॉँग्रेसचा ‘हात’ मोडला? भाजपने केला गेम; थेट 12 नगसेवक फोडले अन्…

मोफत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन…; BMC Electionसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
4

मोफत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन…; BMC Electionसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.