Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bachchu Kadu Sangharsha Yatra : बच्चू कडू पुन्हा मैदानात! शेतकऱ्यांसाठी 250 किलोमीटरीच ‘संघर्ष यात्रा’

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागातील शेतकरी, आदिवासी, कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या मांडण्यासाठी बच्चू कडू यांनी २५० किलोमीटरची संघर्ष यात्रा काढणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 20, 2026 | 01:07 PM
Bachchu Kadu's 250-kilometer Sangharsha Yatra in Melghat for farmer loan waiver

Bachchu Kadu's 250-kilometer Sangharsha Yatra in Melghat for farmer loan waiver

Follow Us
Close
Follow Us:
  • बच्चू कडू यांची मेळघाटमध्ये संघर्ष यात्रा
  • शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बच्चू कडू आक्रमक
  • मेळघाटमधील आदिवासींना न्याय मिळवून देणार – कडू
Bachchu Kadu Sangharsha Yatra : मेळघाट : महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी झालेली नाही. यावरुन विरोधकांनी अनेकदा सरकारवर टीकास्त्र डागले आहे. लवकरच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये तरी बळीराजाला दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागातील शेतकरी, आदिवासी, कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या मांडण्यासाठी बच्चू कडू यांनी २५० किलोमीटरची संघर्ष यात्रा काढणार असल्याचे घोषित केले. (Maharashtra Politics)

माजी मंत्री बच्चू कडू यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या निषेध मोर्चाची घोषणा केली. या सोशल मीडिया पोस्टनुसार, ही संघर्ष यात्रा १ मार्चपासून ९ मार्चपर्यंत चालेल. याची सुरुवात सेमाडोह येथून सुरू होईल आणि चिखलदरा येथे संपेल. ९ मार्च रोजी, या पदयात्रेचा उद्देश महाराष्ट्र सरकारला कर्जमाफीच्या आश्वासनांची आठवण करून देणे आणि विकासापासून दूर असलेल्या मेळघाटमधील आदिवासींना न्याय मिळवून देणे आहे अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.

हे देखील वाचा : राज्यसभा खासदारकीवरुन महाविकास आघाडीमध्ये वादंग? शरद पवार की उद्धव ठाकरे कोणाला मिळणार संधी?

बच्चू कडू यांची संघर्षयात्रा ही चिखलदरा, सलोना, काटकुंभ, खडीमल, जारिदा, हतरु, रायपूर, सेमाडोह या मार्गावरुन जाणार आहे. मेळघाट आणि दुर्गम भाग हा आजही प्रमुख प्रवाहापासून वेगळा आहे. अनेक विकासयोजना आणि सुविधांपासून वंचित आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज, आरोग्य सुविधा, शिक्षणाचा अभाव आणि वीज, पाणी, रस्ते अशा सुविधा नसल्याने बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्जमुक्तीची आठवण व मेळघाट संघर्ष यात्रा… pic.twitter.com/EPAPEttr8Y — BACCHU KADU (@RealBacchuKadu) February 15, 2026

हे देखील वाचा :  ‘ब्लॅक बॉक्स’मधील गुपिते उघड होणार? DFDR डेटा यशस्वीपणे डाउनलोड

संघर्ष यात्रेबाबत बच्चू कडू म्हणाले की, “राज्य सरकार कर्जमुक्तीसाठी कामाला लागल्याचे समजत आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र कर्जमुक्तीसाठी 30 जूनपर्यंत आम्ही वाट पाहू नाहीतर महाराष्ट्रात रेल्वेचे एकही चाक धावू देणार नाही. गट सचिवांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे आम्ही सरकारकडे दिली मात्र सरकार कर्जमुक्ती करणार असून ही कर्जमुक्ती चालू वर्षाची असेल का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, चालू वर्षातील 2025-26 मध्ये कर्जमाफी मिळणे आवश्यक आहे. गांधींच्या मार्गाने आमची ही संघर्षयात्रा असेल मात्र आम्ही भगतसिंगाच्या मार्गानेही आम्ही जाऊ शकतो,” असा इशारा प्रहार नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

Web Title: Bachchu kadus 250 kilometer sangharsha yatra in melghat for farmer loan waiver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • Farmer Protest
  • political news

संबंधित बातम्या

डोनाल्ड ट्रम्पने दाखवली उदारता! Board of Peace ने केली गाझासाठी 10 अब्ज डॉलर्सच्या मदतीची घोषणा
1

डोनाल्ड ट्रम्पने दाखवली उदारता! Board of Peace ने केली गाझासाठी 10 अब्ज डॉलर्सच्या मदतीची घोषणा

तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्षाची ताकद मजबूत; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपला बसला मोठा धक्का
2

तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्षाची ताकद मजबूत; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपला बसला मोठा धक्का

“भाजपविरोधी विचारसरणी एकत्र यावी, हा आमचा उद्देश; राष्ट्रवादीसोबत युतीचे जयंत पाटलांनी स्पष्ट सांगितले कारण
3

“भाजपविरोधी विचारसरणी एकत्र यावी, हा आमचा उद्देश; राष्ट्रवादीसोबत युतीचे जयंत पाटलांनी स्पष्ट सांगितले कारण

आम आदमी पक्षाच्या सभेतच DGP, मुख्य सचिवांचे भाषण; शासकीय नियमांचे उल्लंघन?
4

आम आदमी पक्षाच्या सभेतच DGP, मुख्य सचिवांचे भाषण; शासकीय नियमांचे उल्लंघन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.