Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवार बारातमीमधून पराभूत? विद्यमान आमदारांच्या गंभीर आरोपांमुळे उडाली एकच खळबळ

राज्याची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या निकालावर संशय घेतला जात आहे. आता पुन्हा शरद पवार गटाच्या आमदाराने ईव्हीएमवर संशय घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 29, 2024 | 03:19 PM
Sharad Pawar MLA Uttam Jankar alleges EVM fraud in Maharashtra assembly election results 2024

Sharad Pawar MLA Uttam Jankar alleges EVM fraud in Maharashtra assembly election results 2024

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : राज्यामध्ये काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणूक झाली. यंदाची निवडणूक ही महायुती व महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. राज्यामध्ये झालेल्या बंडखोरीच्या राजकारणानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. मात्र प्रत्यक्षात निकाल आल्यानंतर महायुतीचा एकतर्फी विजय झाला. यामुळे राज्यामध्ये अगदी विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याएवढ्या जागा देखील महाविकास आघाजीच्या कोणत्या घटक पक्षाकडे नव्हते. मात्र ईव्हीएममध्ये घोळ घालून हा विजय मिळवला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यानंतर आता आमदार उत्तम जानकर यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांनी यापूर्वी देखील निकालावर संशय घेतला होता. तसेच त्यांच्या मतदारसंघातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. यानंतर आता उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या निकालावर संशय घेतला असून अजित पवार हे देखील पराभूत झाल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले उत्तम जानकर?

माध्यमांशी संवाद साधून आमदार उत्तम जानकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. उत्तम जानकर म्हणाले की, “नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये गडबड झाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी जवळपास 150 मतदारसंघामध्ये ही गडबड झाली आहे. याची प्रक्रिया राहुल गांधी, शरद पवार आणि निवडणूक आयोग यांच्या लक्षात आणून देणार आहे. ईव्हीएमच्या कंट्रोल बॉक्समध्ये गडबड होत आहे. व्हीव्हीपॅटमधून जी पावती बाहेर येते, ती मतदारांच्या हातात दिली जावी आणि मतदार स्वतःच्या हाताने ती बॉक्समध्ये टाकली जावी,” अशी मागणी आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे.

पुढे आमदार उत्तम जानकर म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये मोठी गडबड झाली आहे. याची सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20 हजार मतांनी पराभूत असल्याचे दिसून येते. अजित पवार यांना एक लाख 80 हजार मते मिळालेली आहेत. त्यापैकी दोनास एक असे सूत्र वापरले गेले आहे. त्यामुळे युगेंद्र पवार यांना 80 हजार अधिक 60 अशी एक लाख 40 हजार मते मिळालेली असून अजित पवारांना केवळ 1 लाख 20 हजार मते उरतात,” असा मोठा आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळाले आहे. मात्र त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. उत्तम जानकर पुढे म्हणाले की, “अजित पवार गटाचे केवळ 12 आमदार निवडून आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांचे केवळ 18 आमदार निवडून आलेले आहेत. तर भाजपाचे केवळ 77 आमदार निवडून आलेले आहेत. महायुतीची एकूण संख्या 107 एवढी होते, दोन-तीन अपक्ष मिळून ते 110 पर्यंतच पोहोचतात. याबाबत मी सर्व मतदारासंघाचा बारकाईने अभ्यास केला” असल्याचेही मत शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Sharad pawar mla uttam jankar alleges evm fraud in maharashtra assembly election results 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 03:19 PM

Topics:  

  • ajit pawar

संबंधित बातम्या

Baramati By Election: सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान, बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार- हर्षवर्धन सपकाळ
1

Baramati By Election: सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान, बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार- हर्षवर्धन सपकाळ

Parth Pawar Oath Ceremony : हळवा क्षण! अजित दादाचं जॅकेट अन् आईची उपस्थिती…, पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा सदस्यपदाची शपथ
2

Parth Pawar Oath Ceremony : हळवा क्षण! अजित दादाचं जॅकेट अन् आईची उपस्थिती…, पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा सदस्यपदाची शपथ

Baramati Politics: ‘आत्या म्हणून जे सांगायचे ते घरात सांगेन!’ पार्थ पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
3

Baramati Politics: ‘आत्या म्हणून जे सांगायचे ते घरात सांगेन!’ पार्थ पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Baramati By- Election: अखेर बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार
4

Baramati By- Election: अखेर बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.