Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? पुण्यात झळकले बॅनर

स्व. अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला नऊ महिने उलटूनही या प्रकरणातील अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 19, 2026 | 05:54 PM
अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? पुण्यात झळकले बॅनर

अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? पुण्यात झळकले बॅनर

Follow Us
Follow Us:
  • अजितदादांच्या मृत्यूला नऊ महिने पूर्ण
  • मृत्यूमागील प्रश्नांवर पुण्यात बॅनर झळकले
  • निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी
पुणे : स्व. अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला नऊ महिने उलटूनही या प्रकरणातील अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी केला आहे. या प्रश्नांकडे सरकार आणि जनतेचे लक्ष वेधण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. या माध्यमातून जनतेच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे गुरनानी यांनी सांगितले.

 

‘अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे,’ असा सवाल फलकांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे. घटनेमागील सत्य समोर येईपर्यंत हा प्रश्न उपस्थित करत राहणार असल्याचे गुरनानी यांनी स्पष्ट केले. न्याय मिळालाच पाहिजे आणि सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

अजितदादांच्या मृत्यूच्या घटनेबाबत अद्याप एफआयआर, तपासाबाबतची ठोस माहिती, चौकशीचा अहवाल आणि अपघातामागील सत्य जनतेसमोर आलेले नाही, असा दावा गुरनानी यांनी केला. त्यामुळे या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा केवळ राजकीय विषय नसून सत्य आणि न्यायाचा प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : भरमसाट मजुरीदराला लगाम, ओतूरमध्ये कांदा लागवडीसाठी नवे दर निश्चित; नियम मोडल्यास…

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी या घटनेबाबत उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे असून, त्यांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गुरनानी यांनी केली. घटनेमागील सत्य जनतेसमोर आणण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पारदर्शकपणे तपास करावा आणि तपासाबाबतची माहिती जनतेसमोर जाहीर करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कोथरूडमध्ये लावण्यात आलेल्या फलकांमधून या मागणीला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : सातबारा, फेरफारसाठी नागरिकांचे हेलपाटे; इंदापूर तहसीलदारांच्या कारभाराविरोधात होणार सर्वपक्षीय आंदोलन

💡

Frequently Asked Questions

  • Que: अजितदादांच्या मृत्यूबाबत गिरीश गुरनानी यांनी काय दावा केला आहे?

    Ans: मृत्यूला नऊ महिने उलटूनही या प्रकरणातील एफआयआर, तपासाची ठोस माहिती, चौकशीचा अहवाल आणि अपघातामागील सत्य जनतेसमोर आलेले नाही, असा दावा गुरनानी यांनी केला आहे.

  • Que: कोथरूडमध्ये फलक का लावण्यात आले आहेत?

    Ans: अजितदादांच्या मृत्यूबाबत जनतेच्या मनातील प्रश्न सरकारच्या आणि नागरिकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.

  • Que: गिरीश गुरनानी यांची प्रमुख मागणी काय आहे?

    Ans: घटनेमागील सत्य जनतेसमोर आणण्यासाठी निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून तपासाची माहिती जाहीर करावी, अशी मागणी गुरनानी यांनी केली आहे.

Web Title: Girish gurnani has raised questions regarding ajitdadas death nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CM Devedra Fadnavis
  • pune news

संबंधित बातम्या

मध्य प्रदेशातून पिस्तुलांचा पुरवठा, पुण्यात विक्रीचा डाव; वाघोली पोलिसांची मोठी कारवाई
1

मध्य प्रदेशातून पिस्तुलांचा पुरवठा, पुण्यात विक्रीचा डाव; वाघोली पोलिसांची मोठी कारवाई

Table Tennis: एकेरीही जिंकली, दुहेरीतही बाजी मारली! गणेश देवखिळे आणि गौरव राव यांची ऐतिहासिक कामगिरी
2

Table Tennis: एकेरीही जिंकली, दुहेरीतही बाजी मारली! गणेश देवखिळे आणि गौरव राव यांची ऐतिहासिक कामगिरी

लालपरीची ‘सत्तर हजारी’ धाव; शिवाजीनगर आगाराचा विक्रम, STच्या इतिहासात राज्यातील सर्वाधिक नोंद
3

लालपरीची ‘सत्तर हजारी’ धाव; शिवाजीनगर आगाराचा विक्रम, STच्या इतिहासात राज्यातील सर्वाधिक नोंद

Sinhgad Institutes: पुण्यातील सिंहगड संस्थेला मोठा धक्का; नवलेंच्या अडचणी वाढल्या? १३ शाळांवर प्रशासक नियुक्त
4

Sinhgad Institutes: पुण्यातील सिंहगड संस्थेला मोठा धक्का; नवलेंच्या अडचणी वाढल्या? १३ शाळांवर प्रशासक नियुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.