नीलम गोऱ्हेंना ४ टर्म आमदारकी कशी मिळाली? शरद पवारांनी सांगूनच टाकलं
दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं वक्तव्य शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाबद्दल केल्यानंतर राजकारण तापलं आहे. यानंतर ठाकरे गटात संतापाची लाट उसळली आहे. त्यावर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी जे म्हटलं, ते १०० टक्के बरोबर होतं. नीलम गोऱ्हे यांना ४ टर्म आमदारकी कशी मिळाली हे सर्वांना माहीत आहे’, असं म्हटलं आहे.
नीलम गोऱ्हे यांनी असं भाष्य केलं नसतं तर बरं झालं असतं असं म्हणत पवारांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं आहे. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल बोलताना पवार म्हणाले, ‘नीलम गोऱ्हे यांनी ते वक्तव्य करायची गरज नव्हती. नीलम गोऱ्हे यांनी असं भाष्य केलं नसतं तर, योग्य झालं असतं. संजय राऊत यांनी जे म्हटलं, ते १०० टक्के बरोबर होतं. नीलम गोऱ्हे यांना ४ टर्म आमदारकी कशी मिळाली हे सर्वांना माहीत आहे’.
‘मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या नेतृत्वातील दोन्ही कार्यक्रम यशस्वी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी होता. त्या कार्यक्रमानंतर तीन कार्यक्रम होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. या कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यातून ६ ते ७ हजार लोक आले होते. या कार्यक्रमाला प्रतिसाद चांगला होता. मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम चांगला झाला, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही’, असं मत ९८ व्या साहित्य संमेलनाविषयी व्यक्त केलं.
‘साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 लाख अन् मर्सिडीज कार’, संजय राऊतांच्या पत्राने वाद पेटणार?
‘नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काम केलं आहे. त्या पुढे शिवसेनेत गेल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांनी काम केलं. सध्या त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काम करत आहेत. त्यांनी कमी कालावधीत चार पक्षांचा अनुभव घेतला आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेता, त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं तर योग्य ठरलं असतं. यासंदर्भात संजय राऊतांची घेतलेली भूमिका योग्य आहे. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर संमेलनाचे आयोजक आहेत, त्यांनी नापंसती दर्शवली आहे. आता या सर्व प्रकारावर पडदा टाकायला कोणतीही हरकत नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.