sharad pawar press marathi news on alliance with uddhav Thackeray in bmc elections 2025
ठाणे : ठाण्यामध्ये प्रति तुळजापूर मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये जेष्ठ नेते शरद पवार हे सहभागी झाले आहेत. शरद पवार यांनी सपत्नीक तुळजा भवानी मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्याबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. तसेच ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार हे धार्मिक कार्यासाठी ठाण्यामध्ये उपस्थित होते. त्यामुळे राजकीय विषयांवर भाष्य करणे त्यांनी टाळले आहे. शरद पवार म्हणाले की, मी मंदिरात जात नाही, असं सांगितलं जातं. पण मला त्याचं प्रदर्शन करायला आवडत नाही, मी राज्याचा प्रमुख असताना चार ते पाच वेळा पंढरपूरला पांडुरंगाची पूजा केली होती. श्रीरामपूरच्या मंदिरात अनेकदा पूजा केली. महाराष्ट्राच्या भल्यासाठी पूजेचं प्रदर्शन करू नये. आज मी माझी पत्नी आणि आमचे सहकारी आलो आहोत, अशी भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली आहेय
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राजकीय वर्तुळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही पक्षाकडून याबाबत सूचक संकेत देण्यात आले आहेत. उद्धव ठाकरेंनी याची पोस्ट देखील केली आहे. याबाबत शरद पवार यांनी त्यांचे मत मांडले आहे. शरद पवार म्हणाले की, आता आपण पवित्र प्राणांगणात आहोत. यामध्ये राजकारण आणू नये. राजकीय प्रश्न आणू नका. कोण कुटुंब एकत्र येत असेल तर आनंद आहे. पण त्यावर भाष्य करण्याचा आजचा प्रसंग नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी ठाकरे कुटुंब एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शरद पवार यांना माध्यमांनी पहलगाम हल्ल्याबाबत केंद्र सरकार घेत असलेल्या भूमिकेवर देखील प्रश्न विचारला. याबाबत शरद पवार म्हणाले की, पहलगामवरील हल्ला हा आपल्या देशावरचा हल्ला आहे. ज्या व्यक्तींचे कुटुंब यात शहीद झाले. त्यांनी देशासाठी किंमत दिली आहे. त्यामुळे त्यांचा धर्म, जातपात भाषा या गोष्टी आणायच्या नाही, महाराष्ट्रीयनांवर हल्ला होत असेल तर देशवासीय म्हणून एकत्र यावे लागेल. मी जाहीरपणे सांगितलं की पंतप्रधान जो काही निर्णय घेतली, उपाययोजना करतील त्याला आमचं समर्थन आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी आमच्या सहकाऱ्यांनी केली. या प्रश्नावर देश आणि सर्व पक्ष एक आहे. हा संदेश देण्यासाठी स्पेशल अधिवेशन उपयुक्त ठरेल, असे स्पष्ट मत जेष्ठ नेते व खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.