
Nagpur Politics
Nagpur Local Body Election: चर्चेत गुंतवून, टाळाटाळ करून शेवटपर्यंत ताणून घेतल्यानंतर अखेर जिल्ह्यात जवळपास महायुती तुटली अन् मविआ फुटल्यात जमा आहे. महायुतीत शिंदेसेनेने सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार ठरविले. भाजपने संबंधितांना तशा स्पष्ट सूचना दिल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अपेक्षाभंग झाला. महाविकास आघाडीत कसीसला आधीपासूनच सहकारी पक्ष नको होते. राष्ट्रवादीने प्रतीक्षा केली. ठाकरे गटाला कुठेही भाव मिळाला नाही. परिणामी, आता सर्वच पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात लठ्ठालठ्ठी करतील, असे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकत्यांनी भरपूर राबल्यानंतर आता कार्यकर्त्यांना त्यांच्या भरवशावर सोडल्याची नाराजी अनेक जण करीत आहे. सोमवार, १७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे फार फार तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार अधिकृत होतील. नगरसेवकाबद्दल अद्यापही साशंकताच आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजय मिळावा, यासाठी मताचे एकगठ्ठाकरण करून नेत्यांनी त्यांची राजकीय पोळी शेकली. आता कार्यकर्त्यांची वेळ आल्यानंतर तुम्ही तुमचे पाहून घ्या, आम्ही पाठीशी आहोत, अशी भूमिका घेत सर्वच राजकीय पक्षांनी शेवटपर्यंत ताटकळत ठेवल्याचे चित्र आहे. त्यातही बहुतांश पक्षाने आपलीच ताकद असा दावा करीत नेत्यांच्याही २ पावले पुढे टाकून विजय हमखास असे चित्र निर्माण केले, परीणामी, सर्वच नेते हतबल दिसत आहे.
Mumbai CNG Shortage: वाहतुकीचा बोजवारा! मुंबईत सीएनजी पुरवठा विस्कळीत, वाहनांच्या लांबच लांब रांगा
शिवसेना शिंदे गट
आमचे सर्व उमेदवार ठरले आहेत. २७ नगराध्यक्षपदाचे तसेच नगरसेवकपदांचे उमेदवारही तयार आहेत. संबंधितांना एबी फॉर्मही दिले. पक्षनेतृत्वाला याची माहिती दिली, यादीतील उमेदवारांची नावे सोमवारी जाहीर करू.
– आ. कृपाल तुमाने, संपर्कप्रमुख, रामटेक लोकसभा
राष्ट्रवादी अजित पवार गट
महायुतीसाठी प्रयत्न केले, चर्चाही केली. मौद्यात शिवसेना शिंदे गटासोबत काही जागांवर निर्णय झाला आहे. भाजपकडून प्रतिसाद मिळत नाही. चर्चा सुरूच आहे. परंतु इच्छुकांचा आग्रह वाढला आहे.
-डॉ. राजाभाऊ टांकसाळे, जिल्हाध्यक्ष, राकाँ अजित पवार गट
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
८८ पक्षाने स्थानिक पातळीवर अधिकार दिले आहेत, स्थानिक नेते त्यांना आवश्यक ते निर्णय घेऊ शकतात, पक्षनेतृत्वाने तशा सूचना केल्या आहेत. प्रत्यक्ष परिणामाची जाण त्यांना असते.
– अश्विन बैस, जिल्हाध्यक्ष
भारतीय जनता पक्ष
भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्याशी अनेकदा संपर्क करण्यात आला. महायुतीबाबत काय, यावर त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र, सातत्याने संपर्कानंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
शिवसेना ठाकरे गट
८८ महाविकास आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. जागावाटपावर चर्चा केली जात आहे. काँग्रेस किती जागा सोडेल, त्याबाबत जाणून घेतले जात आहे. जागेचा तिढा सुटू शकेल.
उत्तम कापसे, जिल्हाप्रमुख, (ठाकरे गट)
राष्ट्रवादी शरद पवार गट
८८ राष्ट्रवादीला आपाठी हवी होती, तशी चर्चाही केली. परंतु समाधान न झाल्याने इतर समविचारी पक्षाला सोबत घेतले. उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
– प्रवीण कुटे पाटील, जिल्हाध्यक्ष
भाजपकडून सातत्याने टाळाटाळ
अडचणीच्या ठरत असलेल्या कामठीत साधला संवाद
इतर ठिकाणी घेतला अंदाज, इतरांना ठेवले ताटकळत
जिल्हाध्यक्षाना चर्चेला पाठवून समाधानाचा प्रयत्न, निर्णय नाही
भाजपकडून शिंदेगटाची फसवणूक, परिणामी स्वतंत्र लढण्याचा निर्णय
शिंदे गटाच्या इच्छुकांना प्रतीक्षेनंतर वाटले एबी
भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही गेम खेळल्याचा सहकारी पक्षाचा आरोप
केदारांनाच नको इतरांची साथ, एकट्यानेच लढायचे
राष्ट्रवादीला काटोल, नरखेडमध्ये हवे होते झुकते माप
भाजपलाही आमची साथ हवी असल्याची सहकारी पक्षाची भूमिका
ठाकरे गटाची ताकद काय, अशा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या भावना
पक्षाचे नेते पाठीशी असल्याचे सांगतात. शेवटी अडकवून ठेवतात, कार्यकर्त्यांच्या भावना