Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

कर्जत पंचायत समितीच्या निवडणुकीत 12 पैकी 10 जागा जिंकत कर्जत परिवर्तन आघाडीने विजय मिळविला आहे.महायुती मधील शेकाप,शिवसेना शिंदे गट यांना केवळ प्रत्येक एका जागेवर विजय मिळाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 09, 2026 | 07:19 PM
कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

Follow Us
Follow Us:
  • 12 पैकी 10 जागांवर आघाडी विजयी
  • आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा झटका
  • महायुतीला केवळ दोन जागांवर विजय
कर्जत : कर्जत तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – शिवसेना ठाकरे गट यांच्या कर्जत परिवर्तन आघाडीने महायुतीला जोरदार स्वीप दिले आहे.जिल्हा परिषद गटाच्या सर्व जागा जिंकत महायुतीला जोरदार झटका दिला आहे.तर कर्जत पंचायत समितीच्या निवडणुकीत 12 पैकी 10 जागा जिंकत कर्जत परिवर्तन आघाडीने विजय मिळविला आहे. महायुती मधील शेकाप,शिवसेना शिंदे गट यांना केवळ प्रत्येक एका जागेवर विजय मिळाला आहे.कर्जत तालुक्यातील आघाडीचा विजय हा आमदार महेंद्र थोरवे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.शेतकरी कामगार पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला असून शिवसेना शिंदे गटाला देखील एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर तीन जागा लढवलेल्या भारतीय जनता पक्ष आणि स्वबळावर एक जागा लढविणाऱ्या मनसेला कर्जत पंचायत समितीमध्ये प्रवेश करता आला नाही.जिल्हा परिषद गटात स्वबळावर एक जागा लढणाऱ्या भाजपने आघाडी आणि महायुतीला मोठे आव्हान दिल्याचे दिसून आले.

Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेचे सहा गट असून त्यातील कळंब जिल्हा परिषद गेटमधून राष्ट्रवादाची काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नारायण डामसे यांनी शिवसेना शिंदे गटाचे हरिचंद्र निरगुडा यांचा अवघ्या २०६ मतांनी पराभव करून विजय मिळवला आहे.कशेळे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वर्षा सुरेश दोरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रमिला भरत शीद यांचा ३७१९ मतांनी पराभव करीत मोठा विजय मिळविला.माणगाव तर्फे वरेडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुवर्णा प्रदीप ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रेशमा योगेश मिसाळ यांचा अवाघ्य्या १९ मतांनी पराभूत करीत विजय संपादन करीत विजय मिळविला,तर स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राधिका किशोर ठाकरे यांनी तब्बल ५०९८ मते मिळवून जोरदार लढत दिली..नेरळ जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गटाच्या सुनीता रोहिदास मोरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सुनीता सुरेश टोकरे यांचा ८८३ मतांनी पराभूत करीत विजय मिळविला.कडाव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गटाचे मारुती तथा बाबू घारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे योगेश कांबेरे यांचा पराभव १९५५ मतांनी पराभव करून विजय मिळविला मोठे वेणगाव गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उषा शंकर ठोंबरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या संगीता वसंत वाघमारे यांचा तब्बल ५५४७ मतांनी पराभव करीत मोठा विजय संपादन केला.

कर्जत पंचायत समितीच्या १२ जगण्यासाठी झालेलया निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट यांच्या कर्जत परिवर्तन आघाडी आणि शिवसेना भाजप शेतकरी कामगार पक्ष यांच्या महायुती सोबत लढत झाली.कर्जत पंचायती समिती मधील पोशीर ग्णामध्ये महायुती कडून लढणाऱ्या शेकापच्या रेशमा अनिल जोशी यांनी राहस्त्रवाडी अजित पवार गटाच्या हर्षला वेहले यांचा १०२४ मतांनी पराभव केला.तर कळंब गणामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कमलाबाई शिंगवा यांनी महायुती शेकापच्या नीलम वसंत ढोले यांचा १७४७ मतांनी पराभव करून विजय संपादन केला.पाथरज गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कविता भरत पादीर यांनी शिवसेना शेकाप महायुतीच्या अश्विनी कांता पादीर यांचा १९७१ मतांनी पराभव करून विजय संपादन केला. कशेळे गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अक्षय राम तिटकारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे सचिन बालकृष्णन भोईर यांचा १४१९ मतांनी पराभव करून विजय मिळविला.माणगाव तर्फे वरेडी गण मध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश सुरेश विरले यांनी शिवसेना ठाकरे गटाचे संदेश रमेश हजारे यांचा १७८ मतांनी पराभव करीत विजय मिळविला.उकरूल गणामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नमिता लहू श्रीखंडे यांनी मनसेच्या प्रियंका जितेंद्र पाटील यांचा २७४९ एवढ्या प्रचंड मतांनी विजय संपादन केला तर महायुती मधील भाजप उमेदवार सुप्रिया राजेश भगत यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

नेरळ गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे भगवान बाळकृष्ण चंचे यांनी भाजपच्या नम्रता नितीन कांदळगावकर यांचा तब्बल ३३६८ मतांनी पराभव करीत मोठा विजय संपादन केला. दामत गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेश लक्ष्मण खारीक यांनी माजी सदस्य भाजपचे नरेश सुरेश मसने यांचा ११९० मतांनी विजय मिळविला.वाकस गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन जयराम धुळे यांनी शिवसेना शिंदे गटाचे १११४ मतांनी पराभूत करीत विजय संपादन केला.कडाव गणामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा चेतन पवाळी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या संध्या सुदाम पवाळी यांचा ६९९ मतांनी पराभव करीत विजय मिळविला.तर मोठे वेणगाव येथे आमदारांच्या सुनबाई श्वेता प्रसाद थोरवे यांचा दारुण पराभव झाला.थोरवे यांना शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा ठाकरे यांनी पराभूत करीत जायंट किलर ठरल्या असून त्यांनी ६०७ मतांनी विजय मिळविला.तर बीड बुद्रुक गण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नमिता सुधाकर घारे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सोयराबाई प्रमोद सुर्वे यांचा 4492 मतांनी पराभव करून विजय मिळविला.

Navi Mumbai Municipal Politics: नवी मुंबईत शिवसेना-भाजप आमनेसामने! खा. म्हस्केंनी दाखवली घोटाळ्यांची फाईल

Web Title: In karjat taluka the karjat transformation front dealt a major blow to the mahayuti alliance winning all six seats of the zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.